कल्याणमध्ये थरार! तरुण जेलमधून सुटला, मैत्रिणीसोबत बोलताना टोळीने घात केला, सपासप वार करत हत्या

Kalyan Youth Killed Gang Attack Old Rivalry: कल्याण पूर्वेत थरारक घटना; जेलमधून नुकताच सुटलेल्या तरुणाची टोळीने धारदार शस्त्राने हत्या. जुन्या वैमनस्यातून हल्ला केल्याचा संशय, आरोपी फरार.
Police investigate the crime scene in Kalyan East where a young man was brutally stabbed to death by a gang over an alleged old rivalry.
Police investigate the crime scene in Kalyan East where a young man was brutally stabbed to death by a gang over an alleged old rivalry.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पूर्व येथील अडवली-ढोकली परिसरात गुरुवारी रात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. एका तरूणांची धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अर्जुन कालपांडे असे मृत तरुणाचे नाव आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Police investigate the crime scene in Kalyan East where a young man was brutally stabbed to death by a gang over an alleged old rivalry.
Pune : पुण्यात भयंकर घडलं! निवारागृहातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं हादरवणार कारण

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अर्जुन कालपांडे हा गुरुवारी रात्री कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकली परिसरात आपल्या एका मैत्रिणीसोबत बोलत उभा होता. याच दरम्यान अचानक त्या ठिकाणी अविनाश झा, बॉम्बे गौरव आणि त्यांचे इतर दोन ते तीन साथीदार आले. काही समजण्याच्या आतच या टोळक्याने अर्जुनवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, गंभीर जखमी झालेल्या अर्जुनचा जागीच मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

Police investigate the crime scene in Kalyan East where a young man was brutally stabbed to death by a gang over an alleged old rivalry.
Pune Crime: पुण्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, १५ लाख लिटर विषारी दारू तयार करण्याचा कट उधळला

मृत अर्जुन कालपांडे हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर सुटून बाहेर आला होता. त्याचा आणि आरोपींचा आधीपासूनच काही वाद होता. याच जुन्या वैमनस्याचा आणि रागाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी त्याचा गेम केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com