Pune : पुण्यात भयंकर घडलं! निवारागृहातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं हादरवणार कारण

Pune News : पुण्यात निवारागृहातील २६ वर्षीय कर्मचाऱ्याची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुसाईड नोटच्या आधारे संस्थाचालकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.
PUNE SHELTER HOME EMPLOYEE SUICIDE CASE: ABETMENT FIR FILED AGAINST INSTITUTION HEAD AFTER SUICIDE NOTE
PUNE SHELTER HOME EMPLOYEE SUICIDE CASE: ABETMENT FIR FILED AGAINST INSTITUTION HEAD AFTER SUICIDE NOTESaam tv
Published On
Summary
  • पुण्यात निवारागृहातील 26 वर्षीय कर्मचाऱ्याची आत्महत्या

  • सुसाईड नोटमध्ये संस्थाचालकावर गंभीर आरोप

  • पुढील तपास सुरु

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. फुरसुंगी येथील एका निवारागृहात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात मृत कर्मचाऱ्याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटच्या आधारे संस्थाचालकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संस्थेतील कथित गैरप्रकारांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेने मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील वडले येथील रहिवासी अतुल अंकुश लाळगे (वय 26) हे गेल्या अडीच वर्षांपासून फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्था संचालित खुले निवारागृहात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. 22 जून रोजी दुपारच्या सुमारास त्यांनी निवारागृहाच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

PUNE SHELTER HOME EMPLOYEE SUICIDE CASE: ABETMENT FIR FILED AGAINST INSTITUTION HEAD AFTER SUICIDE NOTE
Cooking Hacks : सकाळचा स्वयंपाक होईल झटपट! 'या' ६ ट्रिक्स गृहिणींचा वाचवतील वेळ

या घटनेनंतर मृताचा चुलत भाऊ अनिकेत लहुदास लाळगे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार, अतुल यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. कमी वेतनात जादा काम करून घेणे, संस्थेतील विविध घटनांची जबाबदारी एकट्यावर टाकणे, नोकरी सोडल्यास आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे तसेच वैयक्तिक कामे करून घेणे, अशा प्रकारच्या आरोपांचा उल्लेख नोटमध्ये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

PUNE SHELTER HOME EMPLOYEE SUICIDE CASE: ABETMENT FIR FILED AGAINST INSTITUTION HEAD AFTER SUICIDE NOTE
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

याशिवाय, संस्थेमध्ये कर्मचारी असतानाही अनेक जबाबदाऱ्या अतुल यांच्यावर सोपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वेळेवर वेतन न मिळणे, वाढता कामाचा ताण आणि वरिष्ठांकडून होणारा मानसिक दबाव यामुळे ते नैराश्यात गेल्याचेही कुटुंबीयांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी अतुल यांनी आपल्या बहिणीसह कुटुंबीयांशी संवाद साधताना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली होती, असा दावाही करण्यात आला आहे.

PUNE SHELTER HOME EMPLOYEE SUICIDE CASE: ABETMENT FIR FILED AGAINST INSTITUTION HEAD AFTER SUICIDE NOTE
Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

तसेच सुसाईड नोटमध्ये संस्थेतील लहान मुलांशी संबंधित कथित गैरप्रकारांची चौकशी करून न्याय मिळावा, अशी इच्छा व्यक्त केल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोटमधील आरोपांची तसेच संस्थेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्रकरणाच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com