

पुण्यातील काळेपडळ परिसरात १८ वर्षीय अनुष्का चौगुले हिने आत्महत्या केली.
तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली.
नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील काळेपडळ भागात एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. राहत्या घरातच गळफास घेत या तरुणींनी आत्महत्या केली आहे. अनुष्का चौगुले अस आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या तरुणीने टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप समोर आले नाहीये. परंतु नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) NEET UG गुरुवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालासोबतच कट-ऑफ गुण, गुणवंतांची यादी (टॉपर्सची यादी) आणि अंतिम उत्तरतालिका (final answer key) देखील प्रसिद्ध केली आहे. आर्यन गुप्ता आणि पांशुल बन्सल यांनी ७२० पैकी ७१५ गुण मिळवून संयुक्तपणे NEET UG परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे.
यावर्षी परीक्षेत एकूण १९ विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक गुण मिळवले आहेत. याव्यतिरिक्त, ६९० हून अधिक गुण मिळवणाऱ्या १३८ विद्यार्थ्यांपैकी ९३ टक्के विद्यार्थ्यांनी 'नीट-यूजी' (NEET-UG) परीक्षा पहिल्यांदाच दिली होती. या वर्षी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET UG परीक्षा दिली.
पात्र ठरलेल्या एकूण ११.२१ लाख उमेदवारांपैकी ५८ टक्क्यांहून अधिक महिला होत्या. अशाप्रकारे या वर्षी NEET UG परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींचे प्रमाण विद्यार्थ्यांच्या (मुलांच्या) तुलनेत अधिक होते. ५७ टक्क्यांहून अधिक महिला या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५५ टक्के इतके नोंदवले गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.