Telegram Banned : नीट परीक्षेच्या आधी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पेपर फुटीवर लगाम लागणार

NEET Paper Leak : NEET-UG 2026 परिक्षेपूर्वी केंद्र सरकारने पेपरफुटी रोखण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे. याचाच भाग म्हणून टेलिग्राम अॅप ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
NEET UG 2026
NEET UG 2026google
Published On

महिनाभरापुर्वी नीटचे पेपरफुटी प्रकरण समोर आले होते. यामध्ये मोठे अधिकारी आणि शिक्षक गळाला लागले. यानंतर आता सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. येत्या २१ जून रोजी होणाऱ्या NEET-UG 2026 परिक्षेला कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

याचाच एक भाग म्हणून सुरक्षेसाठी टेलिग्राम अॅप हे ३० जूनपर्यंत बंद करण्यात आलं आहे. याचा मोठा फटका टेलिग्राम युजर्सना बसणार असून NEET परिक्षेच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय मानला जात आहे. दरम्यान आता एवढी सुरक्षा असतानाही नीट परिक्षेत कोणता गोंधळ होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

NEET UG 2026
Gold Rate Today : खुशखबर! सोन्याच्या किंमतीत घसरण, वाचा १८,२२ अन् २४ कॅरेटचे ताजे दर

मिळालेल्या माहितीनुसार २२ जूनपर्यंत टेलिग्राम सेवा बंद ठेवली जाऊ शकते. तसेच टेलिग्रामधला ‘मेसेज एडिट’फीचर ३० जूनपर्यंत बंद राहणार आहे. काही दिवसांपूर्वी नीट परिक्षेतचं पेपरफुटी प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं होतं. या प्रकरणामध्ये काही अधिकारी आणि शिक्षकांचीही नावं समोर आली होती. त्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार थांबवण्यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा सतर्क असतात. पेपरफुटी, अफवा किंवा चुकीची माहिती पसरू नये, यासाठी वेळच्या वेळी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे टेलिग्रामबाबतच्या या चर्चेकडे सुद्धा अनेकांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी विद्यार्थी आणि पालकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही माहितीवर लगेचच विश्वास ठेवू नका. परीक्षा, प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र किंवा इतर महत्वाच्या अपडे्ससाठी फक्त अधिकृत वेबसाईट्स आणि परीक्षा प्राधिकरणांनी जारी केलेल्या सुचनांवरच विश्वास ठेवा असं त्यांनी म्हंटलं आहे.

NEET UG 2026
Chanakya Niti: सापापेक्षाही जास्त विषारी असतात या ७ स्वभावाचे लोक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com