संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष-१२ पथकाने दहिसर चेकनाक्यावर केलेल्या कारवाईत महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी दिलीपकुमार सुखू पाल (वय ३७) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकूण ३३,०८,०९० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, गुजरातहून प्रतिबंधित गुटखा घेऊन एक आयशर टेम्पो पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर चेकनाकामार्गे मुंबईत येणार आहे. त्यानुसार कक्ष-१२ च्या पथकाने सापळा रचून संशयित टेम्पो अडवला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहनाची तपासणी केली असता विमल, रजनीगंधा, कमलापसंद, तुळशी रॉयल जाफरानी जर्दा आदी प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. आरोपीकडून गुटखा (१६,१८,०९०), मोबाईल फोन (१०,०००) आणि आयशर कंपनीचा टेम्पो (१६,८०,०००) असा एकूण ३३,०८,०९० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपीने हा माल गुजरातमधून आणल्याची माहिती दिली. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ८३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे , एसीपी रवींद्र अडाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय रासकर करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.