Mumbai : उत्तराखंडमध्ये बसून मुंबईच्या तरुणांची फसवणूक, नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी उकळले; ११ जण अटकेत

Mumbai Crime News : एअर इंडियामध्ये नोकरी मिळवून देण्याचे स्वप्न दाखवत बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा मानखुर्द पोलिसांनी पर्दाफाश केला. ११ आरोपींना अटक करण्यात आली.
AIR INDIA JOB SCAM BUSTED: 11 ARRESTED IN DEHRADUN FOR CHEATING MUMBAI YOUTHS OF LAKHS
AIR INDIA JOB SCAM BUSTED: 11 ARRESTED IN DEHRADUN FOR CHEATING MUMBAI YOUTHS OF LAKHSSaam Tv
Published On
Summary
  • एअर इंडियामध्ये नोकरीचे स्वप्न दाखवून तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक

  • मानखुर्द पोलिसांनी बनावट कॉल सेंटरवर छापा टाकला, ११ आरोपींना अटक

  • तक्रारदाराकडून २.५८ लाख रुपये उकळले गेल्याची माहिती

  • पोलिसांकडून पुढील तपास सुरु

संजय गडदे, मुंबई

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. एअर इंडियामध्ये नोकरी मिळवून देण्याची स्वप्न दाखवत बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी तातडीने कारवाई करत मानखुर्द पोलिसांनी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी उत्तराखंडमधील डेहराडून येथे धाड टाकून ११ जणांना अटक करण्यात आली असून, फसवणुकीसाठी वापरले जाणारे लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द येथील एका व्यक्तीने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. एअर इंडियामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने २ लाख ५८ हजार रुपये उकळल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया, प्रशिक्षण शुल्क, वैद्यकीय तपासणी आणि इतर विविध कारणे सांगून ही रक्कम घेतल्याचे तपासात समोर आले.

AIR INDIA JOB SCAM BUSTED: 11 ARRESTED IN DEHRADUN FOR CHEATING MUMBAI YOUTHS OF LAKHS
Office Hacks : पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपडे भिजले तर काय कराल? 'या' टिप्स करा फॉलो

तक्रार दाखल झाल्यानंतर मानखुर्द पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे आरोपींचे धागेदोरे उत्तराखंडमधील डेहराडूनपर्यंत पोहोचले. त्यानंतर विशेष पथकाने डेहराडून येथे जाऊन संशयित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या ११ आरोपींना अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपी बेरोजगार तरुणांची माहिती विविध ऑनलाइन माध्यमांतून मिळवत असल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर स्वतःला एअर इंडियाचे अधिकारी किंवा भरती विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून ते तरुणांशी संपर्क साधत होते. नोकरी निश्चित असल्याचे सांगून विविध शुल्कांच्या नावाखाली पैसे उकळले जात होते.

AIR INDIA JOB SCAM BUSTED: 11 ARRESTED IN DEHRADUN FOR CHEATING MUMBAI YOUTHS OF LAKHS
Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, सिया गोयलच्या अडचणी वाढल्या; धक्कादायक माहिती उघड

छाप्यात पोलिसांनी अनेक लॅपटॉप, मोबाईल फोन, सिमकार्ड आणि फसवणुकीशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. या साहित्याच्या आधारे देशातील इतर राज्यांमध्येही अशाच प्रकारच्या फसवणुका झाल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) आणि पोलीस उपायुक्त, पूर्व विभाग-1 यांच्या मार्गदर्शनाखाली मानखुर्द पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. या रॅकेटमधील इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, फसवणुकीचे संपूर्ण जाळे उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com