Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, सिया गोयलच्या अडचणी वाढल्या; धक्कादायक माहिती उघड

Pune Ketan Agarwal Murder Case Update News : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. मृत्यूपूर्वी त्याचा मोबाईल सियाकडे कसा गेला आणि त्यातील महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला का, याचा पोलिस तपास करत आहे.
KETAN AGRAWAL MURDER CASE: POLICE PROBE DELETED MOBILE DATA, FORENSIC EXAMINATION UNDERWAY
KETAN AGRAWAL MURDER CASE: POLICE PROBE DELETED MOBILE DATA, FORENSIC EXAMINATION UNDERWAYSaam Tv
Published On
Summary
  • केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट

  • केतनचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला

  • मृत्यूपूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे असल्याचा संशय

  • मोबाईलमधील काही महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला असण्याची शक्यता

अक्षय बडवे, पुणे

Pune Ketan Agarwal Murder Case Update News पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एक नवी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केतन अग्रवालचा मोबाईल फोन त्याच्या मृत्यूपूर्वी सिया हिच्याकडे कसा आला आणि त्या मोबाईलमधील काही महत्त्वाचा डेटा डिलीट करण्यात आला का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. दरम्यान आता केतनच्या फोनद्वारे कोणते नवीन धागेदोरे समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोहगड परिसरात घडलेल्या घटनेदरम्यान केतन खाली पडण्यापूर्वी त्याचा मोबाईल त्याच्याकडे नसून सियाकडे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या परिस्थितीत मोबाईल सियाकडे गेला, हा तपासाचा केंद्रबिंदू बनला आहे.

KETAN AGRAWAL MURDER CASE: POLICE PROBE DELETED MOBILE DATA, FORENSIC EXAMINATION UNDERWAY
Office Hacks : पावसाळ्यात ऑफिसला जाताना कपडे भिजले तर काय कराल? 'या' टिप्स करा फॉलो

केतनच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर सियाने केतनचा मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केला होता. मात्र, कुटुंबीय लोहगडावर पोहोचण्यापूर्वी काही काळ मोबाईल सियाकडेच होता. याच कालावधीत मोबाईलमधील काही महत्त्वाचे पुरावे किंवा डेटा डिलीट करण्यात आला असण्याची शक्यता आहे.

KETAN AGRAWAL MURDER CASE: POLICE PROBE DELETED MOBILE DATA, FORENSIC EXAMINATION UNDERWAY
Health Care : महिनाभर चहा पिणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात? वाचा

पोलिसांनी केतनचा मोबाईल जप्त करून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. दरम्यान, केतनच्या मृत्यूबाबत आधीपासूनच विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात मोबाईलशी संबंधित हा नवा तपासाचा धागा प्रकरणाला वेगळे वळण देऊ शकतो, असे मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com