Devendra Fadnavis | Uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur School case: 'लाडक्या लेकींचा उद्रेक, गृहखात्याची लख्तरे', बदलापूर प्रकरणावर 'सामना'मधून संताप; फडणवीसांवर घणाघात

Saamana Editorial On Badlapur School Case: या घटनेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही भाष्य करण्यात आले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Gangappa Pujari

मुंबई, ता. २१ ऑगस्ट २०२४

बदलापूरमधील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरातून या घटनेवर प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. काल बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत ठिय्या आंदोलन केले. या घटनेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही भाष्य करण्यात आले असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लाडक्या बहिणींच्या लाडक्या लेकी सुरक्षित नाहीत, असे म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

काय आहे सामना अग्रलेख?

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याने वातावरण पेटले आहे. संतप्त पालक आणि जनता रस्त्यावर उतरली. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटत आहेत. प्रश्न संतप्त जनतेचा नाही, तर लोक रस्त्यावर उतरल्यानंतर 'ऍक्शन मोड'मध्ये येणाऱ्या राज्यकर्त्यांचा आहे. या घटनेने मानवी विकृती आणि अमानुषतेचा क्रूर चेहरा तर समोर आलाच, परंतु त्याचबरोबर राज्यकर्त्यांचा स्त्रीदाक्षिण्याचा मुखवटाही टराटरा फाडला. 'लाडकी बहीण' योजनेचे श्रेय ही मंडळी उठताबसता घेत आहे. हे सरकार भगिनींना पैसे तर देत आहे, परंतु त्यांच्या सुरक्षेचे काय? ती कधी देणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

कारवाईत विलंब का?

तुमच्या राज्यातील तीन-चार वर्षांच्या चिमुरडय़ाही सुरक्षित नसतील, नराधमांच्या विकृतीच्या बळी ठरत असतील तर 'भावा'च्या नात्याचे ढोल पिटण्याचा अधिकार तुम्हाला नाही. हे ढोल नसून ढोंग आहे. बदलापूरच्या संतापजनक घटनेने आणि पोलिसी निक्रियतेने हे ढोल फोडले आहेत. ना तुम्ही बहिणींचे रक्षण करू शकत आहात ना सत्तेचा, कायद्याचा वचक राज्यात राहिला आहे. बदलापूर प्रकरणातही ते दिसलेच. अत्याचारग्रस्त चिमुरड्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात 11- 12 तास रखडवून ठेवण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया तब्बल 12 तासांनंतर सुरू केली गेली. हा विलंब कशासाठी करण्यात आला? कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला गेला? ज्या शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे. मग येथेही 'निबंध' लिहून घेऊन कोणाला सोडून देण्याचा विचार होता का? त्यासाठी गुन्हा दाखल करण्यास विलंब लावला गेला का? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी आत्मचिंतन करावे

स्त्री अत्याचारासारख्या नाजूक विषयाला राजकारणाच्या आणि राजकीय फायद्या-तोट्याच्या तागडीत टाकणारा भाजपच आहे. तेव्हा बदलापूरसारख्या दुर्दैवी घटनांचे विरोधकांनी राजकारण करू नये, हे फडणवीस कुठल्या तोंडाने सांगत आहेत ? विरोधकांवर आगपाखड करण्यापेक्षा आपले सरकार गुन्हे आणि अत्याचारांबाबत कुंभकर्णी 'मोड'वर का गेले आहे? जनता आणि विरोधकांनी आंदोलनाचे ढोल, नगारे बडविल्याशिवाय त्याला जाग का येत नाही. याचे आत्मचिंतन फडणवीसांनी करावे.

लाडक्या लेकींचा उद्रेक!

'गुन्हा कुठलाही असो, आधी पीडितांवर दबाव आणायचा, गुन्हा दाखल.करायला विलंब करायचा, मधल्या काळात शक्य तेवढ्या 'साफसफाई'चा प्रयत्न करायचा आणि जनतेच्या. संतापाचा लाव्हा उसळलाच तर 'ऍक्शन मोड' वगैरेवर यायचे हेच राज्याच्या गृहखात्याचे सध्या 'मोड ऑफ ऍक्शन' बनले आहे. मिंधे-फडणवीसांच्या राज्यात 'लाडक्या बहिणीं'च्या 'लाडक्या लेकी' देखील सुरक्षित नाहीत. बदलापुरात उफाळून आलेला लाव्हा याच लाडक्या लेकींचा उद्रेक!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT