विरारजवळ रो-रो बोट समुद्रात अडकली.
बोटीत 200 प्रवासी आणि 75 वाहनं होती अशी माहिती मिळालीय.
कोस्टगार्ड व स्थानिक यंत्रणेने प्रवाशांना सुरक्षित वाचवण्यात आलीय.
विरारच्या समुद्रात रो रो बोट अडकल्याची घटना घडली आहे. सफाळे–विरार दरम्यान सुरू असलेली रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकल्याची बाब समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीमध्ये २०० आणि ७५ वाहनं होती. तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळ प्रवासी आणि वाहनधारक समुद्रातच अडकले होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,सफाळे–विरार दरम्यान सुरू असलेली रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकली. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. दोन तासांपेक्षा अधिक वेळ प्रवासी आणि वाहनधारक समुद्रातच अडकले होते. बोटीचा प्रवास चालू असतानाच बोटीचा रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटला त्यामुळे ही बोट समुद्रातच थांबली.
दोन तासापेक्षा अधिकचा काळापासून प्रवासी समुद्रात अडकून पडले होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराची माहिती मिळताच तात्काळ प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले. कोस्टगार्ड आणि स्थानिक यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्या , त्यांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
दरम्यान रॅम्प हा एक उतार असलेला धातूचा किंवा मिश्र संरचनेचा घटनेकांनी बनलेला असतो. ते घाट जेट्टी आणि फेरीबोटच्या डेक यांना जोडतो असतो. त्यावरून वाहनं फेरीवर चढतात आणि उतरत असतात. फेरी बोट जेट्टीवर आली की रॅम्प उचलला जातो असतो. मात्र या बोटीचा रॅम्पला असलेला हायड्रोलिक पाईप अचानक तुटला. त्यामुळे प्रवासी बोटीत खोळंबले.
मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, असं सांगण्यात येत आहे. बोट जेट्टीवर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या रो रो बोटीवरील कर्मचारी यांना कोणतेही आपत्कालीन परिस्थितीबाबतचे प्रशिक्षण नसल्यामुळे त्यांना काही करता आलं नसल्याची बाब उघडकीस आलंय. दरम्यान समुद्राच्या आतमध्ये प्रियंका नावाची दुसरी रो रो बोट जलसारी येथे पाठविण्यात आली. त्यातून, फेरी बोटीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.