Sindhudurg Shocking : सिंधुदुर्गात समुद्रात ८ पर्यटक बुडाले, तिघांचा मृत्यू, मदतकार्य सुरु

Sindhudurg Shocking News : सिंधुदुर्गात समुद्रात ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडलीये. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे.
Sindhudurg Shocking
Sindhudurg Shocking News :Saam tv
Published On
Summary

समुद्रात ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली.

३ पर्यटकांचा मृत्यू झाला, चौघांना वाचवण्यात यश

वाचवलेल्यांची प्रकृती स्थिर

पर्यटकांचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य वेगाने सुरू

विनायक वंजारे, साम टीव्ही

सिंधुदुर्गातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंधुदुर्गातील शिरोडा समुद्रात ८ जण बुडाल्याची घटना घडली. समुद्रात बुडालेल्या ८ जणांपैकी ४ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत तीन पर्यंटकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सर्व पर्यटक हे सिंधुदुर्गातील होते. या घटनेच्या मृत पर्यटकांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सिंधुदुर्गात शिरोडा येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. शिरोडा समुद्रात पर्यटनासाठी आलेले ८ पर्यटक समुद्रात बुडाले. समुद्रात बुडालेल्या आठ पर्यटकांपैकी तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीने केलेल्या बचावकार्यामुळे तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. बचाव पथकाने वाचवलेल्या ३ पर्यटकांची प्रकृती स्थिर आहे.

Sindhudurg Shocking
Delhi Police : प्रसिद्ध कलाकाराच्या हत्येचं षडयंत्र; रोहित गोदारा-गोल्डी बरार गँगच्या २ शुटरला राजधानीतून अटक

तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आल्यानंतर वाचवण्यात चार जणांना तातडीने शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. बुडालेल्या पर्यटकांपैकी काहीजण कुडाळ येथील आहेत. तर काहीजण बेळगाव (Belgaum) येथील असल्याची माहिती स्थानिक सूत्रांकडून मिळालीये.

Sindhudurg Shocking
Eknath Shinde : बाळासाहेब असते तर...; दसरा मेळाव्यात शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

घटनास्थळी सध्या बुडालेल्या उर्वरित पर्यटकांचा शोध घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा मदतकार्यात व्यग्र आहेत. समुद्रात नेमके किती जण बुडाले आणि वाचवण्यात आलेल्या व मृत व्यक्तींची नावे याबद्दल सविस्तर माहिती अद्याप हाती समोर आलेली नाही.पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Q

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी दुर्घटना घडली?

A

शिरोडा समुद्र किनाऱ्यावर घडली आहे.

Q

दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आहे?

A

दुर्घटनेत ३ पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com