Rana Suryavanshi Case  Saam Tv
मुंबई/पुणे

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास रखडला? १५ दिवसांनंतरही गूढ कायम, ३ निकटवर्तीय फरार

Rana Suryavansh Case: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत आहेत. हल्ल्याला १५ दिवस उलटून गेले तरी देखील हल्ल्यामागचं गूढ कायम आहे.

Priya More
  • राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास अपडेट

  • राणा सूर्यवंशी यांचे तीन निकटवर्तीय अद्याप फरार

  • बारामतीतील राणा सूर्यवंशी हल्ल्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही

सागर आव्हाड, पुणे

गंभीर आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांना राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा उलगडा करण्यात अद्याप यश आलेले नाही. हल्ल्याला १५ दिवस उलटूनही हल्लेखोरांचा नेमका उद्देश काय होता आणि या कटामागे कुणाचा हात आहे, हे स्पष्ट झालेले नाही. चौघांना अटक, एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले असले, तरी राणा यांचे तीन निकटवर्तीय अद्याप फरार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

१८ तारखेला बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला होता. सुरुवातीला गोळीबार झाल्याची चर्चा होती. मात्र, तपासात धारदार शस्त्राने वार केल्याचे समोर आले. घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत कारवाई सुरू केली. मात्र, १५ दिवसांनंतरही हल्ल्यामागचे नेमके कारण समोर आलेले नाही. या प्रकरणात सर्वाधिक चर्चा होत आहे ती राणा यांच्या ३ निकटवर्तीयांची. हल्ल्यानंतर राणा यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत हे तिघे त्यांच्यासोबत होते. मात्र, तपासाची दिशा त्यांच्याकडे वळल्यानंतर तिघेही फरार झाल्याचे समोर आले.

काही सीसीटीव्ही फुटेजमधील हालचालींमुळे त्यांच्यावरील संशय वाढल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांना आरोपी केले असले, तरी अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यांना कोणाचा आश्रय मिळत आहे का? याबाबतही चर्चा सुरू आहे. बारामती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण पवार यांनी या तिघांना अटक झाल्यानंतरच प्रकरणातील अधिक माहिती स्पष्ट होईल, असे म्हटले आहे. दरम्यान, या हल्ल्याने राणा यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेचाही मुद्दा ऐरणीवर आणला आहे. या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा थेट पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतला. राणा यांच्या सुरक्षेसाठी पुणे शहरासह तीन ते चार जिल्ह्यांतील पोलीस कर्मचारी तैनात असल्याची बाब समोर आली.

एका खासगी व्यावसायिकाच्या सुरक्षेसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस मनुष्यबळ वापरले जात असताना, दुसरीकडे पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचारी अपुरे पडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस महासंचालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला असून काहींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राणा यांचे राजकीय वर्तुळातील काही नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा असून, त्यातून पोलिस यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी नियमबाह्य मदत केल्याचे आरोपही समोर येत आहेत.

राणा यांची वाय प्लस सुरक्षा काढून घेण्यात आली असली तरी या सुरक्षेसाठी वापरण्यात आलेल्या पोलिस मनुष्यबळाची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे, हल्ल्याला १५ दिवस उलटूनही तीन निकटवर्तीय फरार आहेत. हल्ल्याचे खरे कारण, त्यामागील सूत्रधार आणि पडद्यामागील व्यक्ती कोण? याचा उलगडा कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'राणाजी... माफ करना, गलती म्हारेसे हो गई!' अशी म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे का, असा सवाल आता या प्रकरणाच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Easy Rangoli Designs For Diwali: रांगोळी काढण्यासाठी वेळ नाही? मग अवघ्या 5 मिनिटांत काढा सुंदर आणि सोप्या रांगोळी डिझाईन्स

Coffee Drinking Tips Before And After Gym: जिमआधी की जिमनंतर, कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Cigarette Smoking: सिगारेट ओढल्यामुळे ओठांचा रंग का बदलतो?

Student Allowance Hike: विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठं गिफ्ट, सरकारकडून निर्वाह भत्त्यात मोठी वाढ; किती रुपये दिले जाणार?

Maharashtra News Live Update: मुंबई- नाशिक महामार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT