

बारामती लोकसभा मतदारसंघात सात लाख मतदार कमी झाल्याचा दावा
एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतील बदलांवरून राजकीय वाद.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात अडीच लाख मतदार कमी झाल्याचा दावा
देशभरात सध्या एसआयआर मोहिमेविरोधात राजकीय रान पेटलंय . दिल्लीत राहुल गांधी, मुंबईत ठाकरेंनंतर. आता बारामतीतून खा. सुप्रिया सुळे यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढलेत. विशेष म्हणजे, स्वतः दीड लाखांहून अधिक मतांनी निवडून येऊनही, सुळेंनी निवडणूकीतील मतदारांचे आकडे मांडून बारामतीतला व्होटचोरीचा मुद्दा उचललाय. सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलं पाहा. खासदार सुप्रिया सुळेंनी मतदारांच्या संख्येची जी आकडेवारी मांडली त्यावर एक नजर टाकूया.
SIR मध्ये बारामती लोकसभा मतदार संघातून 7 लाख मतदार वगळले
केवळ खडकवासला विधानसभा मतदारसंघातून अडीच लाख मतदार कमी
विधानसभेवेळी 50 हजार मतदार वाढले
निवडणुकीनंतर या मतदारसंघात पुन्हा अडीचलाख मतदार कमी झाले.
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सात लाख मतदार अचानक कमी झाल्याचा त्यांनी आरोप केला. बारामती लोकसभा मतदार संघात येणाऱ्या एकट्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून अडीच लाख मतदार कमी झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात 50 हजार मतदार वाढले तर निवडणुकीनंतर या मतदारसंघ पुन्हा अडीच लाखांनी मतदार कमी कसे झाले असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय.
सुप्रिया सुळेंनी ही आकडेवारी चव्हाट्यावर आणून, निवडणूक आयोगाविरोधात देशभरात पेटलेल्या विरोधी पक्षांच्या आंदोलनाच्या यज्ञात जणू काही समिधाच टाकल्यायेत! एसआयआरच्या माध्यमातून तब्बल १३ कोटी नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यात आता थेट निवडून आलेल्या खासदारानेच आयोगाचा हा कारभार पुराव्यानिशी समोर आणलाय. त्यामुळे आता याची चौकशी होणार का याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.