Bjp  saam tv
मुंबई/पुणे

Rajya Sabha Election Special Report : भाजपने राज्यसभेच्या उमेदवारीतून जातीय समीकरणं साधलं? राजकीय वर्तुळात चर्चा

pune political News : माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.त्यामुळं लोकसभेसाठी भाजप पुण्यात मराठा चेहरा देणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, पुणे

Rajya Sabha Election News :

भाजपने राज्यसभेसाठी पुण्यातील ब्राह्मण चेहरा दिला आहे. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे.त्यामुळं लोकसभेसाठी भाजप पुण्यात मराठा चेहरा देणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (Latest Marathi News)

भाजपचा बालेकिल्ला अशी पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाची ओळख होती. मात्र भाजपचा हा बालेकिल्ला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ढासळला. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना कसब्यात विजय मिळवला. भाजपचा कसब्यातील पराभव मागे अनेक सांगितले जात आहेत. मात्र त्यातलं महत्त्वाचं कारण होतं ब्राह्मण उमेदवाराला डावलणं.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यात दिवंगत गिरीश बापट खासदार होते. तर दिवंगत मुक्ता टिळक कसब्यातून आमदार होत्या. असे दोन ब्राह्मण चेहरे पुण्यातून भाजपचे लोकप्रतिनिधी होते. त्याआधी कसब्यातू गिरीश बापट तर कोथरूडमधून मेधा कुलकर्णी भाजपच्या आमदार होत्या.

मेधा कुलकर्णींना राज्यसभेची उमेदवारी

चंद्रकांत पाटील यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णींच्या जागेवर उमेदवारी देण्यात आली. तर गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांचे निधन झालं. त्यामुळे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी पुण्यातून भाजपचा एकही चेहरा विधानसभा किंवा लोकसभेत नव्हता.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही हेमंत रासने या बिगर ब्राह्मण चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आली. त्याचाच फटका भाजपला कसबा पोटनिवडणुकीत बसला असं बोललं जात आहे. त्याचीच भरपाई भाजपा आता मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन करताय असं बोललं जात आहे.

मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवल्याने पुण्यातील ब्राह्मण मतदार भाजपच्या मागे राहील असा भाजपचा कयास असा आहे. त्यामुळे लोकसभेसाठी पुण्यातून भाजप आता ब्राह्मणेतर चेहऱ्याला संधी देईल. असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

पुणे लोकसभेसाठी भाजपकडून माजी खासदार संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक हे मराठा नेते इच्छुक आहेत. तर संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर यांनी देखील लोकसभेसाठी दावा केला आहे. ब्राह्मण चेहरा हे देखील देवधर यांच्या उमेदवारीच्या दाव्या मागील महत्त्वाचं कारण आहे.

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून ब्राह्मणेतर चेहरा असणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे कसब्याची पुनरावृत्ती लोकसभेला होऊ नये हा भाजपचा प्रयत्न असणार आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यसभेवर मेधा कुलकर्णी यांना संधी देऊन ब्राम्हण मतदारांची नाराजी दूर करायण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय.

राज्यसभेवर मेधा कुलकर्णी यांना संधी दिल्यानं पुण्यातून लोकसभेला भाजपचा मराठा उमेदवार असण्याची शक्यता जास्त आहे. भाजपची ही रणनीती कितपत यशस्वी होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT