Rajya Sabha Election 2024 : अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी, सुनील तटकरे यांची माहिती

Rajya Sabha Election 2024 Latest Update : अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
Praful Patel
Praful PatelSaam Tv
Published On

Rajya Sabha Election News :

काँग्रेस, भाजपच्या पाठोपाठ अजित पवार गटाने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील राज्यसभेच्या सर्व उमदेवारांची उमेदवारी जाहीर झाली आहेत. राज्यातून राज्यसभेसाठी ६ नावे देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Praful Patel
Farmers Protest : तर आम्हीही आंदोलनात ऊतरू; बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला इशारा

राज्यातून राज्यसभेच्या उमदेवारी जाहीर

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या म्हणजे १५ फेब्रुवारी शेवटचा दिवस आहे. काँग्रेसने राज्यातून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

Praful Patel
ED on Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सहावे समन्स, न्यायालयानेही नोटीस बजावली; हजर न झाल्यास काय होईल कारवाई?

सुनील तटकरे काय म्हणाले?

प्रफुल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ हा २०२७ साली संपणार आहे. मात्र, तीन वर्षाआधीच पटेल राजीनामा देऊन राज्यसभेची उमेदवारी जाहीर करत आहोत. काही तांत्रिक कारणामुळे हा निर्णय घेत आहोत, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

कारवाई टाळण्यासाठी अजित पवारांची खेळी

राज्यसभा निवडणुकीत अजित पवार गटाने कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी मोठी खेळी खेळली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात याचिका प्रलंबित आहे. वंदना चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्याविरोधात कारवाई टाळण्यासाठी तांत्रिक खेळी अजित पवार गटाने खेळली आहे. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या विरोधातील याचिका निकाली निघणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर एका तरुण चेहऱ्याची वर्णी लागणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com