Farmers Protest : तर आम्हीही आंदोलनात ऊतरू; बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला इशारा

Farmers Protest Update: बच्चू कडू यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळू नये ही आपली सुद्धा इच्छा आहे, पण सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा नाही काढला तर आम्ही सुद्धा आंदोलनात उतरू असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे.
Farmers Protest
Farmers ProtestSaam Digital
Published On

Delhi Farmers Protest

दिल्लीला चारी बाजूंनी शेतकऱ्यांनी घेरलं असून दिल्लीत दाखल होण्याचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान बच्चू कडू यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळू नये ही आपली सुद्धा इच्छा आहे, पण सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा नाही काढला तर आम्ही सुद्धा आंदोलनात उतरू असा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. अनेक गोष्टींची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी देतात मग हमीभावाची गॅरंटी का घेत नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. मी जरी सरकारमध्ये असलो तरी सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणत्याही चांगल्या योजना आणलेल्या नाहीत. बिनकामाच्या योजना बंद करा आणि शेतकऱ्यांना हमीभाव द्या. शेतकऱ्यांच्या खिशात पैसे येत नाही उलट त्यांचा जपकट होतो, तरीही सरकार शेतकऱ्यांचा जपकट करते, सरकारने देरोडेखोरी बंद केली पाहिजे.

दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही भाजपसोबत का गेले?

विकासाचं जाळ आहे त्या जाळ्यात ते अटकले आहेत. विकासाच्या जाळ्यात अटकल्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत, असा टोला त्यांनी अशोक चव्हाण यांना लगावला आहे. अशोक चव्हाण हे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले त्यामुळे ते भाजपमध्ये का गेले? त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न आहे. पण लोकांच्या मनात भ्रम आहे तुम्ही दोन वेळा मुख्यमंत्री असताना का गेला? ते स्पष्ट झालं पाहिजे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Farmers Protest
Loksabha Election: महायुतीचं टेन्शन वाढणार; लोकसभा निवडणुकाच्या मैदानात शरद पवार स्वतः उतरणार

शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाले आहे. पंजाब-हरियाणाचे हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीत जाण्यावर शेतकरी ठाम आहेत. मात्र शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ द्यायचं नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा दिल्लीच्या सीमांवर तैनात करण्यात आला आहे. रात्रभर पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली.

Farmers Protest
Uddhav Thackeray : तर राऊतही भाजपमध्ये गेले असते..., अकोलेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com