अक्षय बडवे, पुणे
भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत तीन जणांच्या नावांचा सामावेश आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , डॉ. अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा सामावेश आहे. त्यात पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पक्षाकडून मोठी संधी मिळाली आहे. (Latest Marathi News)
भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांच्या यादीत पुण्याच्या कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या नावाचा सामावेश आहे. मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. भाजपच्या महिला आघाडीमधील नेत्यांपैकी प्रमुख नाव मेधा कुलकर्णी यांचं आहे. भाजपमधून २ टर्म नगरसेविका म्हणून देखील निवडून आल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मेधा कुलकर्णी या २०१४- २०१९ पर्यंत कोथरूडमधून आमदार राहिल्या आहेत. २०२१ मध्ये मेधा कुलकर्णी यांना भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. महाराष्ट्रातून महिला मोर्चाच्या कार्यकारिणीवर निवड झालेल्या त्या एकमेव पदाधिकारी होत्या.
राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांशी संवाद साधला. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मला खूप आनंद आणि समाधान वाटतंय. पक्षाने विश्वास माझ्यावर दाखवला आहे. मी पक्षातील सर्व वरिष्ठांच्या प्रति कृतज्ञ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर सगळ्यांनी माझावर विश्वास टाकला'.
'आजपासून अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आहे. आता राज्यसभेचा खासदार म्हणून वेगळा अनुभव मिळेल.दिल्लीच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याचे प्रश्न तसेच इतर जबाबदारी दिली त्याबद्दल सर्व प्रयत्न करेल. आज आनंदाचा दिवस आहे. बाकीच्या गोष्टी बोलायची आवश्यकता नाही. छान घडलं असताना वेगळं आठवण्याची गरज नसेल, असेही त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.