Rajya sabha Election : महायुतीची महत्त्वाची बैठक; उमेदवारांच्या नावांवर होणार शिक्कामोर्तब?

Rajya sabha Election : आज रात्री मुख्यमंत्री व दोन्ही उपमख्यमंत्री यांच्यात होणार बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांची नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Mahayuti
Mahayuti Saam TV
Published On

Raj sabaha Election News :

राजकीय पक्षांमध्ये राज्यसभा निवडणुकीच्या धामधूम पाहायला मिळत आहे. सर्व राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीची बैठक बोलवलीय. आज रात्री मुख्यमंत्री व दोन्ही उपमख्यमंत्री यांच्यात होणार बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारांची नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (Latest marathi News)

आज रात्री मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमख्यमंत्री यांच्यात ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. महायुतीमधून राजसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात कोणत्या नेत्यांना उतरवायचं आहे, याची रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तिन्ही पक्षांच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahayuti
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील १० नेत्यांमध्ये शर्यत; उद्या जाहीर होणार उमेदवाराचे नाव

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. राष्ट्रवादीतून कोणत्या नेत्याला उमेदवारी देण्यात यावी यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. अद्याप उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. या बैठकीत सर्व आमदारांना बोलवण्यात आलं होतं. राष्ट्रवादीतून १० नेत्यांची नावे उमेदवारीच्या शर्यतीत आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर नेत्याच्या पक्षांतरामुळे आगामी काळात काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची चर्चा रंगू लागली आहे. राज्यसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते.

Mahayuti
MLA disqualification case : सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या याचिकेवर मार्चमध्ये सुनावणी

शरद पवार गट तयार

राज्यसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचं नाव सुचवलं असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com