Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी, राज ठाकरेंनी भाजपचा शेलक्या शब्दात घेतला समाचार, वाचा नेमकं काय म्हणाले

Shiv Sena MNS alliance News Update : १८ वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असून मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसे युतीची घोषणा करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray Uddhav Thackeray alliance: अखेर राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला आहे. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकेसाठी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली. यावेळी राज ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात पोरं पळवणारी टोळी आली आहे, हे राजकीय नेत्यांना पळवतात, असा टोला राज ठाकरेंनी भाजप अन् शिंदेंच्या (Raj Thackeray–Uddhav Thackeray Alliance Announced) नेत्यांना लगावला. दरम्यान, ज्यांचं मुंबई-महाराष्ट्रावर प्रेम आहे, त्या पत्रकार बांधवांनी आणि इतरांनी आमच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन यावेळी राज ठाकरेंनी केले. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी राज आणि उद्धव यांची संयुक्त पत्रकार परिषद आज हॉटेलमध्ये पार पडली. (Shiv Sena(UBT) and MNS announce alliance ahead of Municipal Corporation elections)

महाराष्ट्रात मुले पळवणाऱ्या टोळ्या -

कोण किती जागा लढवणार, आकडा काय.. हे आम्ही तुम्हाला आताच सांगणार नाही. कारण, महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यामध्ये दोन राजकीय टोळ्यांची भर पडली आहे. ते राजकीय पक्षातील मुले (उमेदवार-नेते) पळवतात, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

निवडणुका लढवणाऱ्या सर्व उमेदवाराला दोन्ही पक्षाकडून उमेदवारी दिली जाते. कधी भरायची ते आपल्याला कळवले जाईल. शिवसेना आणि मनसेची युती झाली, हे आज मी जाहीर करतो, असे राज ठाकरे म्हणाले.

राज-उद्धव युतीची सुरूवात कधी झाली?

१८ वर्षानंतर राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र आले. पण या युतीचा पाया कुठे रचला, याचा अनेकजण विचार करत असतील. पण याचे उत्तर स्वत: राज ठाकरेंनी यावेळी दिले. महेश मांजरेकर यांना एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी वाद विसरून एकत्र यायला हवं, असे म्हटले होते. तेथूनच आम्ही एकत्र येण्याची सुरूवात झाली, असे राज ठाकरेंनी सांगितले.

आता फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल... : उद्धव ठाकरे

मी सगळ्या मराठी जनांना सूचना करतोय. आता जर चुकाल, तर संपाल. आता फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल.. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका. मराठी माणूस सहसा कुणाच्या वाटेला जात नाही. पण त्याच्या वाटेला जर कुणी आलाच, तर त्याला परत जाऊ देत नाही, असं उद्धव ठाकरेंनी मराठी माणसांना यावेळी आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसची उद्या पार्लमेंट्री बोर्डची बैठक असणार

Chanakya Niti: हुशार अन् चतूर महिलांमध्ये असतात हे ७ सीक्रेट, नाव कमावण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Banana Muffins Recipe : ख्रिसमस स्पेशल बनाना मफिन्स, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडतील

नमो भारत ट्रेनमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; तरुण जोडप्याला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? जाणून घ्या

Nandurbar Crime: शिक्षकी पेशाला काळीमा! आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून बलात्कार

SCROLL FOR NEXT