Raj Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: मुंबईत पुन्हा मनसे विरूध्द उत्तर भारतीय? निवडणुकांआधी पेटणार परप्रांतियांचा वाद

MNS vs North Indian: मुंबईमध्ये पुन्हा एकदा मनसे विरुद्ध उत्तर भारतीय मुद्दा पेटला आहे. उत्तर भारतीय विकास सेनेने मनसेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे निवडणुकांआधी परप्रांतियांचा वाद पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Priya More

स्नेहिल शिवाजी, साम टीव्ही

मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी एकीकडे करण्यात आलीये तर दुसरीकडे उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर मनसैनिक भडकलेत. राज ठाकरेंच्या या आदेशानंतर मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांविरोधात आक्रमक होत मनसेने आपल्या स्टाईलने प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंच्या विरोधात पुन्हा एकदा उत्तर भारतीय आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे हे हिंदूविरोधी असल्याचा आरोप करत उत्तर भारतीयांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत मनसेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली आहे. मनसेवर बंदी घालण्यात यावी ही याचिका दाखल केल्याची बातमी आल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते खवळले आहेत. त्यावर मनसेने थेट आरपारची भाषा करत परप्रांतियांना अंगावर घेतलं आहे.

विधानसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाची भूमिका घेत निवडणूका लढवल्या. मात्र त्यांच्या पदरी पुरतं अपयश आलं. यानंतर राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून मराठीची गुढी उभारण्याची भूमिका पुन्हा मराठीचा राग आळवला आणि मराठीचा आग्रह धरत आंदोलन पुकारलं. मात्र आता थेट राज ठाकरेंच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणीच उत्तर भारतीयांनी केली आहे.

दरम्यान बंदीचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला नसून तो अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे येणाऱ्या बिहार निवडणूकांच्या तोंडावर पुन्हा राज्यात परप्रांतिय विरुध्द मराठी हा संघर्ष पेटलाय. त्यामुळे सुप्रीम कोर्ट मनसेवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणार की उत्तर भारतीयांच्या याचिकेला केराची टोपली दाखवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT