Maharashtra Politics :  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का; पुण्यातील शिलेदाराने समर्थकांसह धनुष्यबाण हाती घेतलं

eknath shinde news : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील शिलेदाराने समर्थकांनी धनुष्यबाण हाती घेतलं आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, साम टीव्ही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. पुण्यात मनसेला मोठा झटका बसला आहे. पुण्याचे मनसेचे शहर उपाध्यक्ष संदीप मोहिते पाटील यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यात शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटात जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे. आता पुणे शहरातील मनसेला मोठा धक्का बसला आहे. पुणे शहर मनसेचे उपाध्यक्ष, युवा उद्योजक आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते संदीप मोहिते पाटील यांनी समर्थकांसह मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केला. संदीप मोहिते पाटील यांच्या पक्ष प्रवेश मनसेला मोठा झटका मानला जात आहे.

हेमंत बत्ते, हिंदू युवा प्रबोधनीचे अध्यक्ष राजाभाऊ बेंद्रे, नितीन पायगुडे, प्रतीक सदाशिवराव मोहिते पाटील, रणजित ढगे पाटील, अभीषेक जगताप, विशाल पवार यांच्यासह संदीप मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. हाती भगवा झेंडा घेत भगवा आम्हाला प्राणप्रिय आहे, असा ठाम संदेश दिलाय.

एकेकाळी मनसेच्या माध्यमातून संपूर्ण पुण्यात ठसा उमटवणारे आणि संघटनात्मक बांधणीत पारंगत असलेले संदीप मोहिते पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून राज ठाकरेंना धक्का दिला आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटासाठी हा पक्षप्रवेश अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. या नव्या नेतृत्वामुळे पुण्यातील शिवसेनेला नवचैतन्य प्राप्त होणार असल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता संदीप मोहिते पाटील यांनी मनसेमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

Sushil Kedia: मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल सुशील केडियांचं राज ठाकरेंना थेट आव्हान|VIDEO

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, निवृत अधिकाऱ्याने कुटुंबीयावर गोळ्या झाडल्या; मुलाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT