Raj Thackeray  साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Raj Thackeray Pune visit Live News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांवर संतापले. “काम नसेल करायचं तर पदं सोडा,” असा इशारा देत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मतदार याद्या आणि संघटनेवरही टीका केली.

Akshay Badve, Namdeo Kumbhar

  • पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शाखाध्यक्षांची बैठक पार पडली.

  • या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • “काम नसेल करायचं तर पदं सोडा,” असा इशारा दिला

  • बैठकीत राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले

Raj Thackeray angry in Pune MNS meeting : राज ठाकरे यांच्याकडून आज पुण्यातील शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखा अध्यक्षांची बैठक पार पडली. पुण्यातील संकल्प हॉल मध्ये ही बैठक पार पडली यावेळी मनसे चे वरिष्ट नेते उपस्थितीत होते. यासोबतच शहरातील सर्व शाखा अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत राज ठाकरे स्वतः शाखा अध्यक्ष यांना मार्गदर्शन करणार होते.

बैठकीत सुरवातीलाच राज ठाकरे यांनी एका प्रमुख पदाधिकाऱ्याला त्याच्या सोशल मिडिया पोस्ट वरून फटकारले. तसेच इतर पदाधिकाऱ्यांना सुद्धा अनेक प्रश्न विचारले. मतदार याद्या तसेच पक्ष संघटनेच्या बाबत राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांना प्रश्न विचारले असता अपेक्षित उत्तरं ही समाधानकारक आणि सकारात्मक न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आणि शाखा अध्यक्षांना सुद्धा झापले. "काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. इतके दिवस काय काम केले हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत," असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. यावेळी सुद्धा शाखाध्यक्षांनी माना टाकल्या. तसेच पुढे जाऊन राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना कडक शब्दात सूचना दिल्या. "जे पदाधिकारी काम करणार नाहीत किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार नाहीत त्यांना काढून टाका," अशा शब्दात राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

शाखाध्यक्षांची बैठक ही किमान एक ते दोन तास चालणं अपेक्षित होतं. यावेळी पुणे शहरातील विविध प्रश्न त्यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या बाबत असलेली रणनीती तसेच मतदार यादी यांच्यातील गोंधळ याबाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन हे या बैठकीचा मूळ उद्देश होता. मात्र शहरातील नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून निराशा जनक उत्तर मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी ही बैठक संपवून निघून जाणं पसंत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

ईडीची सर्वात मोठी कारवाई; सुरेश रैना आणि शिखर धवनची कोट्यवधींची संपत्ती जप्त, क्रीडा विश्वात खळबळ

Crime: तरुणाने मैत्रिणीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकला; सांगली हादरली

Maharashtra Politics: नाशिकमध्ये 'आघाडीला' भगदाड, तब्बल २०० निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

National cancer awareness day: भारतात सर्वाधिक वाढणारे ५ कॅन्सरचे प्रकार; शरीरात 'हे' बदल दिसल्यास लगेच जा डॉक्टरांकडे

SCROLL FOR NEXT