Ladaki Bahin Yojana : या लाडक्या बहि‍णींनाच यापुढे ₹१५०० मिळणार, आचारसंहितेतही खात्यावर येणार पैसे, वाचा

Who is eligible for ₹1500 under Ladki Bahin Scheme Maharashtra : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने ई-केवायसी अनिवार्य केलं आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ बंद होणार आहे. आचारसंहितेतही खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanax
Published On
Summary
  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.

  • अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच यापुढे १५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे.

  • आचारसंहिता सुरू असतानाही पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपयांचा हप्ता जमा होणार आहे.

  • बोगस लाभार्थी शोधण्यासाठी ई-केवायसी प्रक्रियेद्वारे पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra Ladki Bahin Yojana e-KYC last date 18 November 2025 : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून ई केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी (e-KYC Deadline for Ladki Bahin Yojana:) पूर्ण करावीच लागणार आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात पैसे येणं बंद होणार आहे. कारण, ई केवायसीनंतर अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनाच यापुढे लाभ मिळणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्यांचा लाभ बंद होईल. राज्यात सध्या आचारसंहिता सुरू आहेत, यामध्ये खात्यावर लाभ येणार का? असा सवाल अनेकांच्या मनात असेल. याचेही उत्तर समोर आलेले आहे. (Ladki Bahin Yojana income limit ₹2.5 lakh verification update)

Ladki Bahin Yojana
Nagpur : नागपूर हादरले, ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, भाचीला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचेही निधन

राज्यातील लाडक्या बहिणींना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावीच लागणार आहे, अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केली त्यांच्या खात्यावर मंगळवारपासून ऑक्टोबरचा हप्ता जमा होत आहे. तर आचारसंहितामध्येही लाडकीच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्याचे कारणही समोर आलेय. ही योजना पूर्वीचीच असून लाभार्थीही निश्चित झालेले आहेत. त्यामुळे लाभासाठी आचारसंहिता लागू असणार नाही, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. (Will Ladki Bahin payment continue during election code in Maharashtra)

Ladki Bahin Yojana
Bihar Elections : बिहारमध्ये १२१ जागांसाठी आज मतदान, तेजस्वी-सम्राट यांच्यात थेट सामना, तर भाऊ तेज प्रतापची स्वतंत्र लढत

आता ‘ई-केवायसी’तून उत्पन्नाच्या निकषांनुसार अपात्र लाभार्थी शोधून त्यांचाही लाभ बंद केला जाणार आहे. त्यामुळे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांचा आर्थिक लाभ बंद होणार आहे. बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडून ई केवायसी करण्यात येत आहे. प्रत्येकवर्षी ई-केवायसी करण्यात येणार आहे. ई-केवायसीनंतर पडताळणी केली जाईल अन् अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत फक्त ९२ लाख महिलांनीच ई केवायसी पूर्ण केली आहे. उर्वरित महिलांना फक्त १२ दिवसात ई केवायसी पूर्ण करावी लागेल.

Ladki Bahin Yojana
Pune crime : पुण्यात अल्पवयीन गँगस्टर्सचा धुमाकूळ, गुन्हेगारी जगतातलं भयान वास्तव, पाहा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com