Raj Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले, बैठक न घेताच मुंबईकडे रवाना; पुण्यात काय घडलं?

Raj Thackeray Pune Meeting: राज ठाकरे अचानक कार्यालयात आल्याने पदाधिकारी आणि नेत्यांची पळापळ सुरू झाली. त्यामुळेच राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

Gangappa Pujari

अक्षय बडवे, पुणे|ता. ३ मार्च २०२४

Raj Thackeray Pune Visit:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आले होते. मात्र अचानक मध्येच दौरा सोडून राज ठाकरे हे मुंबईकडे रवाना झालेत. ठरलेल्या बैठकीला स्थानिक नेते वेळेवर न आल्याने राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच रागाने राज ठाकरे तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी लोकसभेच्या (Loksabha Election) दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते. आज राज ठाकरे पुण्यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाची बैठक घेणार होते. आज दुपारी ३ वाजता विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती.

मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) हे नियोजित वेळेवर येऊन सुद्धा शहर कार्यालयात प्रमुख नेत्यांपैकी कोणीच नव्हते. त्यामुळे राज ठाकरे अचानक कार्यालयात आल्याने पदाधिकारी आणि नेत्यांची पळापळ सुरू झाली. त्यामुळेच राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, नियोजित बैठकीला पदाधिकारी न आल्याने राज ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर विभाग प्रमुखांची बैठक न घेताच राज ठाकरे मुंबईला रवाना झाले. राज ठाकरे गेल्यानंतर शहर कार्यालयात आता नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business idea: डाळ मिल नाहीतर आहे रोजगार अन् पैशाचा कारखाना; गावातच सुरू करा धमाकेदार बिझनेस

Maharashtra Live News Update: पुणे पोलिसांकडून घायवळ कुटुंबियांवर कारवाईचा बडगा

Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

Dry Lips Tips: ओठ खूपच कोरडे पडलेत? मग या घरगुती टिप्सने करा मऊ अन् मुलायम

Increasing arthritis: २०-४० वयोगटातील लोकांना संधिवाताचा धोका वाढला, 'या' एका कारणाने बळावतेय समस्या

SCROLL FOR NEXT