BJP Candidate List : भाजपने पहिल्याच यादीत नाव जाहीर केलं, पण 'या' अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

Pawan Singh Refused to Contest Election : पवन सिंहने लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. मात्र निवडणूक लढवण्यास देखील नकार दिला आहे.
BJP
BJP Saam Tv
Published On

Pawan Singh News :

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपले १९५ उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र २४ तासाते एका उमेदवाराने माघार घेतली आहे. भोजपुरी गायक पवन सिंहने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पवन सिंहने लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. मात्र निवडणूक लढवण्यास देखील नकार दिला आहे. पवन सिंहने निवडणूक लढवण्यास का नकार दिला याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Latest Marathi News)

पवन सिंहने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मी मनापासून आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला आसनसोलमधून उमेदवार म्हणून घोषित केले. पण काही कारणास्तव मी आसनसोलमधून निवडणूक लढवू शकणार नाही. यावेळी पवन सिंहने भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना टॅग केलं आहे.

अभिनेते आणि टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याविरोधात भाजपने पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. पवन सिंहची खूप मोठे फॅन फॉलोइंग आहे. मात्र पवन सिंह यांनी आसनसोलमधून निवडणूक लढवण्यास नकार देऊन सर्वांनाच चकित केले आहे.

पहिल्या यादीत ४ अभिनेत्यांना उमेदवारी

भाजपने पहिल्या यादीत चार भोजपुरी अभिनेत्यांना तिकीट देण्यात आले आहे. यामध्ये आसनसोलमधून पवन सिंग, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, यूपीच्या गोरखपूरमधून रवी किशन, आझमगडमधून दिनेश लाल यादव, आझमगढमधून निरहुआ यांच्या नावाचा समावेश आहे.

BJP
Vijay Wadettiwar : मराठा समाजाला न टिकणारं आरक्षण दिलंय, विजय वड्डेटीवार यांनी केलं हे आवाहन

भाजपने पहिली यादी जाहीर केली त्यावेळी पवन सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले होते. पक्षाने विश्वास ठेवला असेल तर पूर्ण प्रामाणिकपणे आसनसोलच्या जनतेची सेवा करण्याचा उल्लेख केला होता.

पवन सिंह बिहारमधील अरण येथील रहिवासी आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष पवन सिंह यांनाच अरणमधून तिकीट देऊ शकते अशी चर्चा होती. मात्र, पक्षाने त्यांना आसनसोलमधून उमेदवारी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com