

विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
केशव प्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा 'कमळ' असेल, असे विधान केले
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरू
युपीत विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आलाय. सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली असून लवकरच ते जागांची यादी जाहीर करतील. जागावाटपातून ते भाजपला धक्का देण्याची त्यांनी रणनीती आखलीय. त्याआधी भाजपनं मोठा राजकीय डाव टाकलाय. विधानसभा निवडणुकीच्यासाठी भाजपनकडून जोरदार तयारी केली जातेय. अनेक संघटनात्मक बदल केले जात आहेत. मात्र त्याचदरम्यान भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्यावरून विरोधकांना चेकमेट केलंय. त्यावरून युपीत पु्न्हा योगी सीएम नसणार का अशी चर्चा सुरू झाल्या आहेत.
भाजप उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढणार नाही का? भाजप जिंकल्यास योगी पुन्हा सीएम होणार नाहीत का असे प्रश्न विचारले जात आहेत. त्याचं कारण ठरलंय, उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचे विधान. भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी जालौन येथे पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत एक महत्त्वाचे विधान केलंय. राज्यात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, 'कमळाचे फूल' (भाजपचे निवडणूक चिन्ह) हाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार असं म्हटलंय.
मथुरेतील एका बैठकीनंतर, केशव प्रसाद मौर्य यांनी 'राधे-राधे, कमळ खिला दे' (राधे-राधे, कमळ फुलवा) या घोषणेवर प्रतिक्रिया दिली. लोक आधी 'जय श्री राम'चा जयघोष करत होते आणि आता 'राधे-राधे, कमळ खिला दे' अशी घोषणा देत आहेत, तर मग यामुळे अखिलेश यादव यांना त्रास का व्हावा? हा निवडणुकीचा मुद्दा नसून भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाचा विषय असल्याचं मौर्य म्हणालेत.
"जर त्यांना असे वाटत असेल की आम्ही 'राधे राधे'चा जप केला तर त्यांनीही स्वतः 'राधे राधे'चा जप करावा." एका जिल्ह्यात 'जय श्री राम'चा नारा दिला जात आहे. पंजाबमधील भाजप-अकाली दल युतीबाबत काँग्रेस पक्षाने केलेल्या टिप्पणीलाही केशव प्रसाद मौर्य यांनी प्रत्युत्तर दिलंय. पंजाबमधील काँग्रेस पक्ष अगदी त्याच प्रकारची काल्पनिक आणि अवास्तव स्वप्ने पाहत आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची युती पाहत आहे.
यावेळीही पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षच सरकार स्थापन करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. केशव मौर्य यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले होते, त्याचप्रमाणे यावेळी पंजाबमध्येही भाजपचे सरकार स्थापन होईल असं मौर्य म्हणाले. त्याचवेळी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, असा प्रश्न करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी 'कमळ' (भाजपचे निवडणूक चिन्ह) हाच उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असे म्हटलंय. त्यावरून उत्तर प्रदेशात भाजप विजयी झाले तर योगी आदित्यनाथ गे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अशी चर्चा सुरू झालीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.