4 हजार कुटुंबांना म्हाडाची घर खाली करण्याची नोटीस; नेमकं कारण काय?

Mhada Issues Vacate Notices To 4000 Families In Mumbai: मुंबईतील संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या सुमारे ४ हजार कुटुंबांना म्हाडाने घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. बायोमेट्रिक सर्वेक्षणाला अनुपस्थिती आणि आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
MHADA NOTICE TO 4000 FAMILIES IN MUMBAI
MHADA NOTICE TO 4000 FAMILIES IN MUMBAIsaam tv
Published On: 

मुंबईतील सुमारे ४ हजार कुटुंबांना म्हाडाने घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. बायोमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान अनुपस्थित राहणे आणि वास्तव्याशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जीर्ण किंवा कोसळलेल्या सेस इमारतींमधील मूळ रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी संक्रमण शिबिरांमध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामधील सुमारे २० हजार घरांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. प्रतीक्षा नगर, धारावी, मालवणी, मालाड, सहकार नगर (चेंबूर), कन्नमवार नगर, बिंबिसार नगर आणि गोराई या परिसरांतील संक्रमण शिबिरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

MHADA NOTICE TO 4000 FAMILIES IN MUMBAI
नकली केसांवरून चेष्टा केली थेट रॉड, दगड अन् दांडक्याने मारहाण; कल्याणमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी

सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे रहिवाशांची पात्रता तपासली जात आहे. यामध्ये मूळ रहिवासी, कायदेशीररीत्या घराचा ताबा मिळवलेले रहिवासी आणि अनधिकृतपणे वास्तव्य करणारे रहिवासी अशा विविध श्रेणी तयार करण्यात येत आहेत. ही यादी तयार झाल्यानंतर म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

MHADA NOTICE TO 4000 FAMILIES IN MUMBAI
बारवी धरणाच्या पाणी कपातीला तात्पुरती स्थगिती; नागरिकांना दिलासा

अनुपस्थित रहिवाशांना पुन्हा संधी मिळणार

म्हाडाचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश वाघ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी एखाद्या घरात गेले असता काही रहिवासी कामानिमित्त बाहेरगावी किंवा आपल्या गावी गेल्यामुळे उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण होऊ शकले नाही. ज्या रहिवाशांना अद्याप नोटीस मिळालेली नाही आणि ज्यांचे सर्वेक्षण बाकी आहे, त्यांना बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे उमेश वाघ यांनी स्पष्ट केले.

MHADA NOTICE TO 4000 FAMILIES IN MUMBAI
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पनवेल-कर्जत लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा; 15 डिसेंबरला महत्वाचा टप्पा पार पडणार

संक्रमण शिबिरांमधील घरांची अनधिकृत विक्री, खरेदी आणि बेकायदेशीर ताब्याबाबत गेल्या काही वर्षांपासून तक्रारी येत होत्या. त्यामुळे पात्र रहिवाशांची ओळख पटवणे आणि अनधिकृत वास्तव्याला आळा घालणे, या उद्देशाने म्हाडाने बायोमेट्रिक सर्वेक्षण हाती घेतले आहे. आता सर्वेक्षणानंतर तयार होणाऱ्या पात्रता यादीकडे आणि पुढील कारवाईकडे संक्रमण शिबिरांतील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.