मुंबईत ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा झाला
या मोर्चानंतर झालेल्या सांगता सभेत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली
एसआयआर रद्द करण्याची मागणी त्यांनी केली
त्याचसोबत निवडणूक बॅटेल पेपरवर घेण्याची मागणी त्यांनी केली
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा झाला. या मोर्चानंतर झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी दोन महत्वाच्या मागण्या केल्या. ईव्हीएम मशीन बंद करा आणि एसआयआर रद्द करावं, अशी मागणी त्यांनी केली. याचसोबत त्यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या एसआयआरला विरोध केला.
राज ठाकरे यांनी दोन प्रमुख मागण्या करत सांगितले की, 'महाराष्ट्रात एसआयआर रद्द झाला पाहिजे. एसआयआर बेकायदेशीर आहे. यातून २ कोटी लोकांना बाहेर काढले आहे. हे लोकं कोण आहेत ते शोधायला पाहिजे. ते आमचे मतदार आहेत. वोटिंग मशीन बंद होऊन पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे. कोणाचीही सत्ता येऊ द्या पण ती योग्य मार्गाने आलेली असावी.'
भाजपने सर्व संस्था आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. ते म्हणाले की, 'भाजपकडून मनमानी कारभार सुरू आहे. हे सर्व निवडणूक आयोगाला बांधल्याशिवाय होत नाही. सर्व चॅनेल्स यांनी ताब्यात घेतली आहेत. सर्व संस्था सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहेत. निवडणूक आयोग देखील यांच्याच ताब्यात आहे. आज भाजप सत्तेत आहे उद्या दुसरा पक्ष सत्तेत असेल आणि त्या पक्षाने अशी सत्ता राबवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल. तुम्ही फक्त आंदोलनं करा.'
तसंच, 'या देशाचा ढाचा बदलत आहे. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांनी कसं जगायचं कसा राहायचं या जगामध्ये? जे लोकांचे काम करेल, विश्वास देईल लोकं त्यांना मतदान करतील. लोकांवर वरवंटे फिरवण्याचे काम सध्या सुरू आहे. २०१७-१८ पासून मतचोरी सुरू आहे. २०१७- १८ पासून हा राज ठाकरे तुम्हाला सांगत आहे निवडणुकीवर बहिष्कार टाका. त्याशिवाय दूध का दूध पाणी का पाणी होणार नाही.', असे राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.