EPFO Alert : नोकरदारांनो लक्ष द्या! ऑक्टोबरचा PF जमा करण्याची शेवटची तारीख ठरली! लगेच जाणून घ्या

PF Rules Changed in 2026: EPFO ने ऑक्टोबर महिन्याचा पीएफ जमा करण्यासाठी १५ नोव्हेंबर अंतिम तारीख ठरवलेली आहे.
EPFO Update
EPFO Updatesaam tv
Published On: 

देशातल्या कोट्यवधी नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कंपन्यांना ऑक्टोबर २०२६ महिन्याचा पीएफ वेळेत जमा करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी १५ नोव्हेंबर २०२६ ही शेवटची तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांना आता लवकरच पीएफचे पैसे जमा करावे लागतील. विशेष म्हणजे, यंदा पीएफच्या नियमांमध्येही मोठा बदल झाला आहे.

सरकारने पीएफसाठीची वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार रुपये केली. त्यामुळे बऱ्याच नव्या कर्मचाऱ्यांनाही पीएफचा लाभ मिळेल. या बदलाचा तुमच्या पगारावर आणि पीएफ कपातीवर काय परिणाम होणार? जाणून घेऊया.

१. १५ नोव्हेंबरपर्यंत जमा करावा लागणार ऑक्टोबरचा PF

EPFO ने कंपन्या आणि नियोक्त्यांना ऑक्टोबर २०२६ या वेतन महिन्याचा इलेक्ट्रॉनिक चलन-कम-रिटर्न (ECR) भरून पीएफचे पैसे जमा करायला सांगितले आहे. यासाठी १५ नोव्हेंबर ही शेवटची मुदत असेल.

EPFO Update
Railway Employees : सरकारी नोकरी असूनही रेशनवर स्वस्त धान्य घेतलं; १.८२ लाख कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

२. ECR म्हणजे नेमकं काय?

ECR म्हणजे Electronic Challan-cum-Return. हा कंपन्यांना दर महिन्याला भरावा लागणारा ऑनलाइन तपशील आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार, त्यांच्या पगारातून कपात केलेली पीएफची रक्कम आणि कंपनीकडून जमा होणारे योगदान याची माहिती असते. यामध्ये तीन महत्त्वाच्या योजनांचा समावेश असतो.

  • EPF: कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील बचत.

  • EPS: कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना.

  • EDLI: कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण.

EPFO Update
Stress And Blood Pressure: वयाच्या २०-३० व्या वर्षीच बीपी वाढतोय? तुमच्या रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायेत घातक

३. पीएफची वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार

पीएफसंदर्भातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे सरकारने अनिवार्य पीएफ सदस्यत्वासाठीची वेतन मर्यादा १५ हजारांवरून २५ हजार रुपये केली. हा बदल १७ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाला आहे. यामुळे १५ हजार ते २५ हजार रुपये मासिक वेतन असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांनाही आता पीएफच्या सामाजिक सुरक्षा योजनेत समाविष्ट होण्याची संधी मिळेल.

४. तुमच्या पीएफ कपातीवर काय परिणाम होणार?

पीएफसाठी १२ टक्के योगदानाचा दर गृहीत धरल्यावर, आधी १५ हजार रुपये सॅलरीवर कर्मचाऱ्याचं योगदान १,८०० रुपये होत होतं. आता २५ हजार रुपये वेतन मर्यादेनुसार ही रक्कम ३,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.