Stress And Blood Pressure: वयाच्या २०-३० व्या वर्षीच बीपी वाढतोय? तुमच्या रोजच्या 'या' ५ सवयी ठरतायेत घातक

High Blood Pressure : वयाच्या २० ते ३० व्या वर्षांतच तरुणांमध्ये बीपी वाढण्याची समस्या दिसत आहे.
High Blood Pressure
High Blood Pressure Saam Tv
Published On: 

आजकालची लाइफस्टाइल खूप धापळीची आणि स्ट्रेसमधली झाली आहे. ऑफिसमधल्या कामाचा ताण, पैशांचं टेन्शन, सतत मोबाईलचा वापर, अपुरी झोप आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे काहींचा ताण वाढतो. विशेष म्हणजे, आता फक्त जेष्ठ नागरिकांमध्येच नाही, तर वयाच्या २० ते ३० व्या वर्षातल्या तरुणांमध्येही उच्च रक्तदाबाची समस्या वाढताना दिसतेय. मग सततचा तणाव खरंच ब्लड प्रेशर वाढवू शकतो का? डॉक्टर याबद्दल काय सांगतात, जाणून घेऊयात.

१. स्ट्रेस आल्यावर शरीरात नेमकं काय होतं?

मानसिक ताण आला की, आपल्या शरीरात कॉर्टिसोल (Cortisol) या हार्मोनचे प्रमाण वाढतं. त्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने पडतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी रक्तदाब वाढू शकतो. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मौर्यदीप घटक यांच्या मते, शरीर मानसिक आणि शारीरिक तणाव यामध्ये फारसा फरक करू शकत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून काम करतानाही शरीर धोक्याची परिस्थिती असल्याप्रमाणे प्रतिक्रिया देऊ शकते.

High Blood Pressure
Railway Employees : सरकारी नोकरी असूनही रेशनवर स्वस्त धान्य घेतलं; १.८२ लाख कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

२. सततच्या तणावामुळे बीपी वाढू शकतो?

काही मिनिटांचा ताण नॉर्मल असू शकतो. पण सतत कामाचा ताण, ट्रॅफिक, पैशांचं टेन्शन आणि वैयक्तिक समस्यांमुळे मेंदू सतत सतर्क अवस्थेत राहतो. बरेच दिवस असा तणाव राहिल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढू शकतो, असं संशोधनातून समोर आलं.

३. अपुऱ्या झोपेचाही होतो परिणाम

तणावाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या झोपेवर होतो. झोपेत असताना हृदय आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. सामान्यतः झोपेच्या वेळी रक्तदाब कमी होतो. पण, सततच्या तणावामुळे ही प्रक्रिया बिघडू शकतं.

High Blood Pressure
Gold Silver Price: सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोनं तब्बल 2,500 रुपयांनी स्वस्त; चांदीचे दरही कोसळले, वाचा 24K आणि 22K चे दर

४. चुकीच्या जीवनशैलीमुळे धोका वाढतो

तणावामुळे अनेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. काहीजण व्यायाम करणे सोडतात, तर काहीजण जंक फूड, धूम्रपान आणि मद्यपानाकडे वळतात. या सवयींमुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका आणखी वाढतो.

५. हृदयाच्या आरोग्यावरही होतो परिणाम

सततचा तणाव फक्त मानसिक आरोग्यासाठीच नाही, तर हृदयासाठीही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मोबाईलचा कमी वापर आणि कामासोबत वैयक्तिक आयुष्यात संतुलन राखणं महत्त्वाचं आहे.

टीप: ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. वैद्यकीय निदान किंवा उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.