Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune News: माहेरून पैसे घेऊन ये नाहीतर..., सासरच्यांकडून मानसिक अन् शारीरिक छळ; विवाहितेने संपवलं आयुष्य

Pune Crime: पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी नवरा, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील दत्तावाडी परिसरात ही घटना घडली. माहेरून पैसे आणण्यासाठी सासरची मंडळी या महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळेपुण्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिलेच्या नवरा, सासू आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. माहेरून पैसे न आणल्याने सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून या विवाहितेने राहत्या घरी आयुष्य संपवलं. ही घटना दत्तवाडी परिसरात सोमवारी सकाळी १० वाजता घडली. साजिदा असीम शेख (वय २३, वर्षे) असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला पर्वती परिसरातील जनता वसाहतमध्ये राहत होती.

याबाबत विवाहितेच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विवाहितेचा पती आणि सासू-सासऱ्याविरोधात पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिदाला सातत्याने माहेरून पैसे आणण्याचा दबाव टाकला जात होता. त्यासाठी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यात येत होता. या छळाला कंटाळून तिने घरी गळफास घेऊन आयुष्य संपवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पर्वती पोलिस करत आहेत.

दरम्यान, ऑगस्टमध्ये पुण्यात एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. स्नेहा झेंडगे असं या विवाहितेचे नाव होते. स्वयंपाक नीट येत नाही आणि माहेरून २० लाख रुपये घेऊन ये यासाठी या विवाहितेचा सासरच्यांकडून छळ होत होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी सासरच्या ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famours Actress : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर गोळीबार, सिनेसृष्टीत खळबळ

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या छतावर चढलेल्या युवकाला लागला विजेचा धक्का, नागपूर स्थानकातील घटना

Hingoli : शेतावरून घरी निघाल्या, ओढा ओलांडताना घात झाला; २ शेतकरी महिला बेपत्ता

Banjara Reservation: बंजारा समाजासाठी OBC नेते मैदानात, सरकारला शह देण्यासाठी OBC नेत्यांची खेळी?

ATM Slip Fraud Alert: ATM ची स्लीप फेकणं महागात पडणार? स्लीप फेकल्याने KYC हॅक होणार?

SCROLL FOR NEXT