शासकीय पत्रातच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. काँग्रेसनेते नाना पटोले यांनी याविषयीची माहिती विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांना दिली. तसेच ते पत्र ही समोर आणले. सरकारी पत्रातच नरेंद्र मेहता यांचा उल्लेख भूमाफिया असा करण्यात आला आहे. त्यांनी स्टँप ड्यूटी बुडवल्याचा आणि मराठी आणि गुजराती नागरिकांच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप देखील नाना पटोले यांनी केला. या सर्व आरोपांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बावनकुळे म्हणाले, नाना पटोले हे राजकरणामुळे आणि पार्टीबाजीमुळे असे आरोप करत आहे. ही जी काही नरेंद्र मेहतांची तक्रार आहे त्याची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.