Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Pune Crime News : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Pune Crime News update
Pune Crime News Saam tv
Published On
Summary

पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग

त्रिताल ढोल ताशा पथकातील दोन सदस्यांकडून पत्रकारावर हल्ला

महिला पत्रकाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई

आरोपींची नावे चिराग नरेश किराड आणि अनुज बबन नवगिरे अशी आहेत

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक ३० तासांहून अधिक वेळ सुरु राहिली. पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीत हजारो गणेशभक्त सामील झाले. मात्र, या गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशा पथकातील दोन सदस्यांनी महिला पत्रकाराचा विनयभंग केला. या ढोल ताशा पथकाच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज मंगळवारी पुणे पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Pune Crime News update
Job Recruitment : एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियात ९०० हून अधिक पदासाठी भरती; कुठे अन् कसा कराल अर्ज?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गणेश विसर्जनाला गणेशभक्तांची हजारोंची गर्दी होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या गणेश विसर्जनाचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार (वय वर्ष २०) ही कॅमेऱ्यामॅनसोबत उपस्थित होती.

ही महिला पत्रकार दगडूशेठ गणपती मंदिरात उभी होती. त्यावेळी त्रिताल ढोल ताशा पथकातील सदस्यांनी दोघांच्या मार्गात अडथळा आणला. या पथकातील एकाने ट्रॉलीचे चाक महिलेच्या पायावर घातलं. महिला पत्रकाराने जाब विचारल्यानंतर एका सदस्याने त्यांना स्पर्श करून ढकलून दिलं.

महिला पत्रकाराच्या सहकाऱ्याने जाब विचारल्यानंतर पथकातील या दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर महिला पत्रकाराने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदवला. या घटनेनंतर आमदार रोहित पवार आणि शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला होता.

Pune Crime News update
TET : राज्यातील लाखो शिक्षकांचा पगार अडकणार, वेतन अधीक्षकांचे शाळांना महत्वाचे आदेश; ‘टीईटी’ संदर्भातील नवीन अपडेट काय?

विनयभंगाच्या प्रकारानंतर पोलिसांनी दोघांची शोधाशोध सुरु केली होती. त्यानंतर आज मंगळवारी महिला पत्रकाराचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. चिराग नरेश किराड (वय 24 वर्ष), अनुज बबन नवगिरे ( वय 34 वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फारसखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण प्रकार घडला होता. या दोघांनाही फारसखाना पोलिसांनी अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com