पुणे ट्रॅफिक पोलिसांनी खासगी बसेससाठी मार्ग, वेळ आणि थांब्यांमध्ये मोठे बदल केले आहेत
खासगी लक्झरी ट्रॅव्हल्सना फक्त काही ठिकाणी थांबा देण्यात आला
या बसेसला निवडलेल्या मार्गांवरच सायंकाळी प्रवेश मिळणार आहे
कोणत्याही बस थांब्यावर ३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबण्यास मनाई करण्यात आली आहे
पुणेकरासांठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या आणि पुण्यातून बाहेर जाणाऱ्या खासगी बसेस, ट्रॅव्हल्स यांच्या मार्गात, वेळेत आणि थांब्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पुणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या कार्यालयामध्ये लक्झरी ट्रॅव्हल्स आणि खासगी बसेस असोसिएशन अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
खासगी बसने पुण्यात येणाऱ्यांसाठी आणि पुण्यातून बाहेर जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. पुणे शहरात ठराविक मार्गांवर खासगी लक्झरी बसेस आणि ट्रॅव्हल्स यांना प्रवेश मिळणार आहे. पुणे शहरामध्ये येणाऱ्या आणि पुणे शहरातून बाहेर जाणाऱ्या खासगी बसेसला सायंकाळी ६ ते रात्री १० दरम्यान ठरवून दिलेल्या मार्गावरच प्रवेश मिळणार आहे. खासगी बसेसला इतर मार्गांवर प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
पुणे शहरातील कोणत्याही बस थांब्यावर ३ मिनिटांपेक्षा जास्त वेळ बस थांबण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून यावर १५ दिवसांत हरकती नोंदविण्याचे वाहतूक पोलिसांनी आवाहन केले आहे. एकाच ठिकाणी तीन ते चार बसेस उभ्या राहिल्यामुळे पुण्यातील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते आणि याचा त्रास इतर नागरिकांना होत असतो. याच सर्व बाबी लक्षात घेता तसंच पुणे शहरातील वाहतुकीस होणारा अडथळा आणि वाहनचालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने हा मोठा निर्णय घेतला आहे.
१. स्वारगेट येथील मित्रमंडळ चौक व पद्मावती पार्किंग येथून सातारा रस्ता मार्गे जाणाऱ्या बस व्होल्गा चौक- मार्केट यार्ड चौक, सातारा रस्ता, पद्मावती, कात्रज चौक, नवले पूल आणि नवीन कात्रज बोगदा या मार्गाने जातील
बस थांबा - मित्रमंडळ चौक आणि कात्रज सर्पोद्यान.
२. स्वारगेट येथील मित्रमंडळ चौक व पद्मावती पार्किंग येथून सोलापूर रस्ता मार्गे जाणाऱ्या बस व्होल्गा चौक- मार्केट यार्ड, सातारा रस्ता, गंगाधाम चौक, वानवडी बाजार चौकी, सोलापूर रस्ता, हडपसर मार्गे जातील.
बस थांबा - भैरोबानाला आणि शेवाळवाडी
३. स्वारगेट येथील मित्रमंडळ चौक व पद्मावती पार्किंग येथून मुंबईकडे जाणाऱ्या बस दांडेकर पूल, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूल, पौड रस्ता, चांदणी चौकमार्गे जातील.
बस थांबा- या मार्गावर कुठेही बस थांबा नाही.
४. संगमवाडी पार्किंग येथून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या बस संगमवाडी, आंबेडकर चौक, गोल्फ चौक, वाघोली या मार्गाने जातील.
बस थांबा - खराडी बायपास आणि वाघेश्वर पार्किंग
५. संगमवाडी पार्किंग येथून नाशिककडे जाणाऱ्या बस संगमवाडी - सादलबाबा चौक- चंद्रमा चौक, मुळा रोड, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस ब्रीज, नाशिक फाटा, नाशिक रोड या मार्गाने जातील.
बस थांबा - या मार्गावर कुठेही बस थांबा नाही.
६. संगमवाडी पार्किंग येथून मुंबईकडे जाणाऱ्या बस संगमवाडी- सादलबाबा चौक, चंद्रमा चौक, मुळा रोडा, पोल्ट्री फार्म चौक, हॅरिस ब्रीज, नाशिक फाटा, जुना मुंबई-पुणे हायवे, निगडी मार्गाने जातील.
बस थांबा - या मार्गावर कुठेही बस थांबा नाही.
७. वारजे जंक्शनवरूनअहील्यानगरकडे जाणाऱ्या बस आंबेडकर चौक कर्वे रोड पौड फाटा एस एन डी -टी- लॉ कॉलेज एस बी रोड पुणे विद्यापीठ चौक -संचेती इंजिनिअरींग कॉलेज संगमवाडी पार्किंग सादलबाबा चौक आंबेडकर चौक गोल्फ चौक शास्त्रीनगर चौक नगर रोड वाघोली मार्गे जातील.
बस थांबा - सगंमवाडी पार्किंग
१. मुंबई ते अहील्यानगर रोडमार्गे जाणाऱ्या बस हॅरिस ब्रिज जुना मुंबई पुणे हायवे पोल्ट्री फार्म चौक नगर रोड चौक मुळा रोडने चंद्रमा आंळदी रोड जंक्शन -आंबेडकर चौक गोल्फ कल्ब चौक शास्त्रीनगर वाघोली मार्गे जातील.
बस थांबा - संगमवाडी, खराडी बायपास, वाघेश्वर पार्किंग
२. मुंबई ते सोलापुर रोडमार्गे जाणाऱ्या बस जुना मुंबई पुणे हायवे हॅरिस ब्रीज पोल्ट्री फार्म चौक चंद्रमा आंळदी रोड जंक्शन चौक गोल्फ कल्ब चौक आंबेडकर शास्त्रीनगर चौक नगर रोड खराडी बायपास मुंढवा मगरपट्टा हडपसर मार्गे - सोलापुर रोड मार्गे जातील.
बस थांबा- संगमवाडी, खराडी बायपास, शेवाळवाडी
३. मुंबई ते सातारा रोड मार्गे जाणाऱ्या बस पुणे शहरामधून प्रवेश नाही (नो एन्ट्री) परंतू पुणे बंगलोर बायपास मार्गे बाणेर चांदणी चौक वारजे --वडगाव ब्रिज नवले ब्रिज नवीन कात्रज बोगद्यातून साताराकडे जातील.
बस थांबा - या मार्गावर कुठेही बस थांबा नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.