Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुपरफास्ट होणार, वाहतूककोंडी फोडण्यासाठी १४२६० कोटींचा मेगाप्लान, वाचा

Mumbai–Pune Expressway 10-lane project full details : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे ६ पदरीवरून १० पदरी करण्यासाठी राज्य सरकारकडे १४,२६० कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. २०३० पर्यंत चार नवीन लेन जोडल्या जाऊ शकतात.
Mumbai Pune Expressway
Mumbai Pune Expressway Saam TV Marathi News
Published On
Summary
  • मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर ४ नवीन लेन वाढवण्याचा निर्णय घेतला.

  • सध्या ६ लेन असलेला ९५ किमीचा महामार्ग २०३० पर्यंत १० पदरी होणार

  • एमएसआरडीसीने प्रस्ताव सादर केला आहे.

  • यापूर्वी अमृतांजन पूल पाडून सुद्धा कोंडी कमी न झाल्याने महामार्ग विस्ताराची गरज तातडीची ठरली.

Mumbai Pune Expressway Latest News Update : देशातील पहिला एक्सप्रेस वे अर्थात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Yashwantrao Chavan Expressway) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या प्रवासाला अधिक वेळ लागतोय. आता सरकारकडून द्रुतगती महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून (state government) तब्बल १४२६० कोटींचा मेगाप्लान तयार करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आता आणखी ४ लेन वाढण्यात येणार आहे. ९५ किमीचा हा महामार्ग सध्या सहापदरी आहे. पुढील काही वर्षांत हा महामार्ग दहा पदरी होईल. त्यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरातील प्रवास आणखी सुपरफास्ट होईल. (Why Mumbai–Pune Expressway needs 4 more lanes)

९५ किलोमीटर लांबीच्या मुंबई-पुणे या द्रुतगती मार्गावर आणखी चार पदरी मार्ग जोडण्यासाठी १४,२६० कोटी रुपये इतका अंदाजे खर्च येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने hindustantimes सोबत बोलताना सांगितले. याबाबत एमएसआरडीसीकडून ( महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्य सरकारने चार लेन वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तर निविदा प्रक्रिया नियोजनानुसार पार पडतील. आणि २०३० पर्यंत एक्सप्रेसवेमध्ये चार नवीन लेन जोडल्या जातील, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितलेय.

मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा एक्सप्रेस वे १ एप्रिल २००२ रोजी सर्वसामान्यांसाठी खुला झाला. या द्रुतगती महामार्गावर सध्या सहा लेन आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या महामार्गावर दररोज ८० हजार ते एक लाख वाहनांची वाहतूक असते. विकेंडला अथवा सुट्ट्यांच्या काळात ही वाहतूक आणखी वाढते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे. वाहतूककोंडी फोडण्यासाठी २०२० मध्ये महामार्गावरील १९० वर्षे जुना अमृतांजन पूल पाडण्यात आला. पण वाहतूककोंडी काही कमी झाली नाही. त्यामुळे या महामार्गावर आणखी चार लेन वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

Mumbai Pune Expressway
Local Body Election : अजित पवारांना एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का, गोगावलेंनी रायगडचे राजकारण फिरवले

अडोशी बोगद्यापासून खंडाळा एक्झिटपर्यंतचा हा मार्ग सहा पदरी आहे. पण एक्सप्रेस वेचे सहा पदरी आणि जुना मुंबई-पुणे महामार्गाचे चार पदरी, असे महामार्ग १० पदरी वाहतुकीची सुविधा देतो, असे अधिकाऱ्याने सांगितले. मागील शुक्रवार-शनिवारी या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसून आली. पाच ते दहा किमीच्या रांगा लागल्या होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबतचा राग व्यक्त केला आहे. एका युजर्सने मुंबई-पुणे या प्रवासासाठी आठ तास लागल्याची तक्रार केली. तर दुसरा एक व्यक्ती म्हणाला की, यापेक्षा कमी वेळ जुना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने लागतो. त्याशिवाय टोलही कमी द्यावा लागतो. आपण नेमकी प्रगती करतो की मागे पडतोय, असा प्रश्न पडला आहे.

Mumbai Pune Expressway
Mine Collapse : पूल तुटला, आरडाओरडा अन् किंकाळ्या, ४० जणांचा मृत्यू, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

वाढती वाहतूककोंडी पाहून २०२० मध्ये हा महामार्ग आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता एमएसआरडीसीने १० लेनपर्यंत सुधारित प्रस्वात तयार केला आहे. वाढत्या वाहतुककोंडीमुळेच नव्हे तर मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे आणखी वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला हा एक्सप्रेसवे अपग्रेड करण्याची आवश्यकता असल्याचे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने म्हटलेय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेला आणखी चार लेन जोडण्यासाठी १४,२६० कोटी रुपयांचा अंदाजे खर्च येणार आहे. त्यापैकी राज्य सरकार ४०% योगदान देण्याची शक्यता आहे तर उर्वरित रक्कम निविदा देणार्‍या कंपनीकडून उचलली जाण्याची शक्यता आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai Pune Expressway
Mumbai Crime : मध्यरात्री मुंबई हादरली! २७ वर्षाच्या फ्रेंच तरूणीसोबत नको ते केले, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com