Shreya Maskar
महाराष्ट्रात स्वर्गाहून सुंदर एक निसर्गरम्य ठिकाण लपलेले आहे. हिवाळ्यात येथे धुक्याचे चादर पाहायला मिळते. तसेच थंड वातावरण अनुभवता येते.
महाराष्ट्रातीत हे भन्नाट लोकेशन म्हणजे सावळ्या घाट. सावळ्या घाट हा ताम्हिणी घाटाजवळ आहे. जे पुण्यापासून जवळ आहे.
सावळ्या घाट ट्रेकिंगसाठी एकदम बेस्ट लोकेशन आहे. ताम्हिणी घाट रस्त्यावरून ट्रेकवर जाता येते. ताम्हिणी घाट मुळशी जवळ आहे.
सावळ्या घाटावरून कुंडलिका व्हॅली, देवकुंड धबधबा, रिंग वॉटरफॉल आणि प्लस व्हॅली यांचे भन्नाट सौंदर्य पाहायला मिळते.
सावळ्या घाटला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून भेट द्या. येथे तुम्हाला शांत आणि स्वच्छ वातावरण अनुभवता येतील.
सावळ्या घाटाजवळ फोटोशूटसाठी देखील सुंदर लोकेशन आहे. जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी येथे नक्की जा.
सावळ्या घाटातून जाताना हिरवीगार डोंगर, गर्द झाडी आणि डोंगरदऱ्यांमधून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे दिसतात.
तुम्ही मुंबईहून बाय रोड सावळ्या घाटला जा. कारण तुम्हाला वाटेत निसर्गाचे सुंदर नजारे पाहायला मिळतील. तसेच हा प्रवास ट्रेनने देखील करता येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.