Shreya Maskar
वेंगुर्ला बीच हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक स्वच्छ, नितळ समुद्रकिनारा आहे. वेंगुर्ला बीच कोकणाच्या सौंदर्यात भर घालतो.
वेंगुर्ला बीचवर जलक्रीडांचा आनंद घेता येतो. त्यामुळे मित्रांसोबत येथे नक्की जा. उदा. पॅरासेलिंग, स्कूबा डायव्हिंग आणि पोहणे
कोकणात गेल्यावर संध्याकाळी निवांत वेळ घालवण्यासाठी वेंगुर्ला बीच बेस्ट लोकेशन आहे.
वेंगुर्ला बीचजवळ कुडाळ हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. कुडाळहून वेंगुर्ला बीचवर पोहोचण्यासाठी बस किंवा रिक्षाचा वापर करता येतो.
कोंडुरा हा वेंगुर्ल्यातील एक प्रसिद्ध आणि रहस्यमय समुद्रकिनारा आहे. सुंदर, शांत आणि गर्दीपासून दूर असलेला हा किनारा पांढरी वाळू आणि काळ्या खडकांसाठी ओळखला जातो.
वेंगुर्ल्यामध्ये श्री देवी सातेरी मंदिर आहे. त्यामुळे येथे जाऊन देवीचे आशीर्वाद आवर्जून घ्या. येथे मंगलमय वातावरण अनुभवता येते.
वेंगुर्ला बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर आणि विहंगम देखावा दिसतो. त्यामुळे येथे कमाल फोटोशूट होते. निसर्गाच्या सानिध्यात विरंगुळ्यासाठी भन्नाट लोकेशन आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे नक्की फिरायला जा. बीचच्या आजूबाजूला नारळ, आंबा आणि काजूची झाडे पाहायला मिळतात.