Shreya Maskar
हिवाळ्यात चिखलदरा या हिल स्टेशनला नक्की भेट द्या. जोडीदारासोबत येथे निवांत वेळ घालवता येईल.
चिखलदरा या निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर गाविलगड किल्ला, मेघदूत उद्यान, भीमकुंड, चिखलदरा धरण, शितल नदी आणि वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी फिरायला जा.
चिखलदरा येथे गाविलगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. गाविलगड किल्ला ट्रेकिंगसाठी देखील बेस्ट पर्याय आहे.
चिखलदरा येथील मेघदूत उद्यान हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे, असे म्हणता येईल. हे उद्यान चिखलदरा टेकड्यांमध्ये आहे आणि वन्यजीवप्रेमींसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे.
भीमकुंड हे चिखलदरा जवळील एक पवित्र स्थान आहे. असे मानले जाते की, महाभारतातील भीमाने या कुंडात स्नान केले होते, म्हणूनच याला भीमकुंड म्हणतात.
चिखलदरा येथे चिखलदरा धरण, शक्कर तलाव आणि पंचबोल पॉइंट ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. हिवाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.
चिखलदरा येथे सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसते. त्यामुळे तुम्ही 'सनसेट पॉईंट' पाहायला नक्की जा. येथे सुंदर फोटोशूट देखील करता येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.