Shreya Maskar
भाट्ये बीच रत्नागिरी शहराच्या जवळ भाट्ये नावाच्या गावात आहे. तुम्ही येथे जोडीदारासोबत आवर्जून फिरायला जा.
भाट्ये बीच स्वच्छतेसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. हिवाळ्यात येथे थंड हवा अनुभवता येते.
भाट्ये बीचवर सूर्यास्ताचा सुंदर नजारा अनुभवता येतो. त्यामुळे येथे संध्याकाळी आवर्जून जा.
भाट्ये बीचवर शिंपले गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी होते. येथे स्थानिक लोक निवांत क्षण घालवण्यासाठी येतात.
कोकणात गेल्यावर वन डे पिकनिकसाठी भाट्ये बीच उत्तम पर्याय आहे. कोकणात असे अनेक समुद्रकिनारे आहेत. जेथे फिरायला तुम्हाला नक्की आवडेल.
रत्नागिरी स्टेशनला उतरून रिक्षाने भाट्ये बीचपर्यंत पोहचू शकता. मुंबईतून कोकणासाठी ट्रेन देखील आहे. प्रवास सोपा होईल.
भाट्ये बीच आणि मांडवी बीच हे रत्नागिरीतील जवळचे समुद्रकिनारे आहेत आणि त्यांच्याजवळ गणपती मंदिर आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.