Shreya Maskar
तांबळडेग बीच हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातच आहे. हिवाळ्यात येथे थंड वाऱ्याचा सुंदर अनुभव घेता येतो.
तांबळडेग बीच स्वच्छ निळ्या समुद्र, रुपेरी वाळू आणि हिरव्यागार सुरुच्या बनांसाठी ओळखला जातो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.
तांबळडेग बीच वरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तांबळडेग बीचवर बोटिंगचा आनंद घेता येतो.
तांबळडेग समुद्रकिनाऱ्याला लागून डोंगराच्या कुशीत 'माता गजबा देवीचे' मंदिर आहे. समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला डोंगराच्या पायथ्याशी मंदिर आहे.
तांबळडेग येथे प्रामुख्याने मासेमारी व्यवसाय केला जातो. येथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात.
तांबळडेग बीच, कुणकेश्वर बीच आणि मिठबाव बीच जवळ आहेत. हे समुद्रकिनारे कोकणाच्या सौंदर्यात भर घालतात.
तांबळडेग बीचच्या जवळ कुणकेश्वर मंदिर आणि देवगड किल्ला आहे. जे पर्यटकांचे आकर्षण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.