Pune To Ayodhya Bus Saam Tv
मुंबई/पुणे

Pune To Ayodhya Bus: रामभक्तांसाठी खुशखबर! अयोध्येची वारी लालपरीने करता येणार, एप्रिलमध्ये पहिली गाडी पुण्यातून रवाना होणार

Rohini Gudaghe

अक्षय बडवे

Latest Pune News

जानेवारी महिन्यात रामलल्लाची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडलं. राम मंदिराचंही लोकार्पण (Pune To Ayodhya Bus) झालं. तेव्हापासुन भाविकांसाठी रामलल्लाचं दर्शन खुलं झालं आहे. सर्व भाविकांना श्री रामप्रभूंच्या दर्शनाची आस आहे. सरकारने देखील भाविकांना रामलल्लाचं दर्शन घेता यावं म्हणून विशेष गाड्यांची सोय देखील केली होती.  (Latest Marathi News)

आताही सर्व रामभक्तांसाठी खुशखबर आहे. आता पुण्यातून लालपरीने अयोध्येची पारी करता येणार आहे. याबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊ (Ayodhya Bus) या. एसटी महामंडळाच्या या उपक्रमामुळे भाविकांचं रामलल्लाचं दर्शन घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी राज्य परिवहन विभाग पुण्यातून बस सोडणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुणे ते अयोध्या बस

भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवण्यासाठी एसटी हा विशेष उपक्रम राबवत आहे. पुणे जिल्ह्यातून भाविकांच्या मागणीनुसार या एसटी बस सोडल्या जाणार (Ram Mandir Darshan) आहेत. जर ४५ ते ५५ जणांचा एक समूह एकत्र प्रवास करणार असेल, तर एसटी सोडली जाणार आहे. खरं या बातमीमुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

२४ एप्रिल रोजी राज्यातून पहिली गाडी अयोध्येला रवाना होणार आहे. भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवण्यासाठी पुण्यातून एसटी बस सोडण्यात येत (Ram Mandir Ayodhya) आहेत. ५० जणांचा ग्रुप असेल तर सोयीनुसार आणि मागणीनुसार एसटीची पाहिजे ती गाडी भक्तांना मिळू शकणार आहे. त्यामुळे भाविकांना आता आपल्या लाडक्या रामप्रभूचं दर्शन घेणं सोपं झालं आहे.

अयोध्येची वारी लालपरीने

अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रती किलोमिटर ५६ रुपये भाडे आकारले जाणार आहे. या यात्रेत साधारण ३ ते ४ मुक्काम होण्याची शक्यता ( Pune News) आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रत्येक बससोबत २ ते ३ चालक देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवासामध्ये भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाणार आहे.

अयोध्येची वारी आता लालपरीने करता येणार आहे. राज्य परिवहन विभाग अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनासाठी बस सोडणार (Pune To Ayodhya Bus Fare) आहे. त्यामुळे भाविकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. एप्रिलमध्ये पहिली गाडी महाराष्ट्रातून अयोध्येला रवाना होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT