Ram Lalla
Ram LallaSaam TV

Vishnu idol Found In Karnataka : चमत्कार! कर्नाटकात सापडली हुबेहुब अयोध्येतील रामलल्ला सारखी भगवान विष्णूची मूर्ती, 1000 वर्ष जुनी असल्याचा दावा

Karanataka Vishnu idol News : कर्नाटकातील कृष्णा नदी पात्रात सापडलेली मूर्ती अगदी रामलल्लाच्या राम मंदिरातील मूर्तीशी मिळतीजुळती आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा पुतळा बसवण्यात आला आहे.
Published on

Vishnu idol :

अयोध्येत मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. रामभक्तांच अनेक वर्षांचं स्वप्न सत्यात उतरलं आहे. तर दुसरीकडे कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात हुबेहूब अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीसारखी मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती सुमारे हजार वर्ष जुनी असल्याचं बोललं जात आहे. हा एक प्रकारचा चमत्कारच मानला जात आहे.

कर्नाटकातील कृष्णा नदी पात्रात सापडलेली मूर्ती अगदी  रामलल्लाच्या राम मंदिरातील मूर्तीशी मिळतीजुळती आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा पुतळा बसवण्यात आला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, ही मूर्ती ११व्या किंवा १२व्या शतकातील असू शकते.

Vishnu idol Found In Karnataka
Vishnu idol Found In KarnatakaTwitter
Ram Lalla
BJP Mission Ayodhya: भाजपचं 'मिशन अयोध्या'; मुंबईकरांना घडवणार रामलल्लाचं मोफत दर्शन, पहिली ट्रेन आज होणार रवाना

भगवान विष्णूच्या मूर्तीसोबत एक प्राचीन शिवलिंगही सापडले आहे. भगवान विष्णूच्या या मूर्तीचे स्वरूप आणि रूप हे अयोध्येतील रामलल्लाच्या भव्य आणि दिव्य मंदिरात स्थापित केलेल्या मूर्तीसारखे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भगवान विष्णूच्या या मूर्तीच्याभोवती 'दशावतार' कोरलेले आहेत. मूर्ती मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांनी सजवली आहे. भगवान विष्णूच्या मूर्तीला चार हात आहेत, त्यापैकी दोन हात शंख आणि चक्राने सुसज्ज आहेत. दोन हात सरळ खाली आशीर्वादाच्या मुद्रेत आहेत. त्यापैकी एक 'कटी हस्त' आणि दुसरे 'वरद हस्त' आहे.

Ram Lalla
Ram Mandir: ईस्ट असो की वेस्ट, देशाच्या कोणत्याही भागातून पोहोचता येईल अयोध्येत; नवीन हवाई मार्ग सुरू

सापडलेली मूर्ती एखाद्या मंदिराचा भाग असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. मंदिराच्या तोडफोडीपासून वाचवण्यासाठी ते नदीत फेकली असावी. या मूर्तीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मूर्तीच्या नाकाला किंचित इजा झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com