Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

Healthy Diet: कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सर्व फॅट्स बंद करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, योग्य फॅट्सचा समावेश केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Cholesterol Diet Mistakes
Cholesterol Diet Mistakesgoogle
Published On

सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांचा फॅट वाढत चालला आहे. लोक या समस्येला घेऊन खूप टेन्शनमध्ये असतात. त्यासाठी लोक हेवी डाएट आणि योग्या, जीम अशा ना ना प्रकारच्या सवयी लावतात. याने अर्थातच त्यांना फॅट कमी व्हायला मदत होते. मात्र संशोधनात ही सवय कोलेस्ट्रॉल असणाऱ्या रुग्णांसाठी धोक्याची मानली जाते. त्यामुळे ह्रदयाच्या अनेक समस्याही निर्माण होतात. पुढील लेखात आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

ZOE या न्यूट्रिशन रिसर्च संस्थेच्या सहसंस्थापक प्रा. टिम स्पेक्टर यांच्यासोबत काम करणाऱ्या प्राध्यापक डॉ. सारा बेरी यांच्या मते, प्रत्येक प्रकारचं कोलेस्टेरॉल वाईट नसतं. शरीराच्या कार्यासाठी कोलेस्टेरॉल आवश्यक असतं, ते पूर्णपणे कमी करणं योग्य नाही.

Cholesterol Diet Mistakes
Jio-Airtel चे टेंन्शन वाढलं! BSNL ने लॉन्च केले 500GB डेटाचे दोन स्वस्त प्लान्स

डॉ. बेरी यांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सर्व फॅटी फूड्स बंद करणे हा उपाय चुकीचा आहे. उलट, हेल्दी फॅट्सचा समावेश केल्याने कोलेस्टेरॉल सुधारतं, तर जास्त कार्बोहायड्रेट्सयुक्त आहारामुळे कोलेस्टेरॉल वाढतं. LDL म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमधून साचून अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस तयार करू शकतं, त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे येऊ शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

तज्ज्ञांच्या मते, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स असलेले पदार्थ आहारात नियमित घेतल्याने LDL कोलेस्टेरॉल कमी होऊ शकतं. त्यासाठी मासे, सुकामेवा आणि वनस्पतीजन्य तेल अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा. संशोधनानुसार, अशा प्रकारचा फॅट्स आहारात समावेश करुन हृदयरोगाचा धोका 10 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

यासोबतच संपूर्ण धान्य, कडधान्य, फायबरयुक्त पदार्थ आणि साखर व रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स कमी करणं फायदेशीर ठरू शकतं. डॉ. बेरी सांगतात की योग्य आहारात हे लहान बदल केल्याने फक्त 10 दिवसांत कोलेस्टेरॉलवर सकारात्मक परिणाम दिसू शकतो. मात्र कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Cholesterol Diet Mistakes
Dog Crying: रात्री दारासमोर कुत्री रडणं शुभ की अशुभ? सत्य वाचून सरकेल पायाखालची जमीन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com