Sakshi Sunil Jadhav
कुत्रा हा सगळ्यांच्या आवडीचा पाळीव प्राणी आहे. कुत्र्याला सुद्धा इच्छा आवड आणि माणसांच्या भावनांची कदर असते.
काहीवेळेस कुत्रा हा माणसाच्या बुद्धीपेक्षा जास्त चपळ असल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. पाळीव कुत्रा हा त्यांच्या मालकांना घरकामात मदत करताना पाहायला मिळतो.
काहींना कुत्र्यांची माणसांना खूप भीती वाटते. याचं कारण म्हणजे कुत्री अचानक भुंकणे किंवा रडणे.
काही लोकांना कुत्र्याचं रडणं खूप भयानक वाटतं. यामागचे अनेक तर्क लावले जातात पुढे आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
काहींना वाटतं कुत्रा घराच्या बाहेर रडल्याने त्याला नकारात्मक शक्ती दिसते. तर काहींना वाटतं की हे घरात कोणीतरी खूप आजारी पडण्याचे संकेत आहेत.
वैज्ञानिक दृष्ठ्या हे लावलेले तर्क चुकीचे आहेत. जर कुत्रा रडत असेल तर त्याला काही वेदना होत असतात.
जसा कुत्रा भुंकून आपल्या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीला आवाज देतो. तसंच त्याला जेवन न मिळाल्यास तो आवाज देतो.
तुम्ही अशावेळेस कुत्र्याला भाकरी किंवा जेवण खाऊ घाला. जमल्यास पाणी पाजा. तुम्ही घाबरुन न जाता त्यांना मदत करा.