Sakshi Sunil Jadhav
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने खासगी कंपन्यांना जोरदार धक्का देत दोन नवीन स्वस्त रिचार्ज प्लान्स लॉन्च केले आहेत. या प्लान्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, प्रचंड डेटा आणि फ्री टीव्ही चॅनल्सचा लाभ दिला जात आहे.
BSNL ने ₹299 आणि ₹399 किंमतीचे दोन नवीन रिचार्ज प्लान ऑफिशिअल X (Twitter) हँडलवरून जाहीर केले आहेत.
दोन्ही प्लान्समध्ये संपूर्ण भारतातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
ग्राहकांना 20 Mbps वेगाने तब्बल 500 GB डेटा वापरण्याची सुविधा दिली जाणार आहे.
500 GB डेटा संपल्यानंतरही 2Mbps स्पीडने इंटरनेट वापरता येणार आहे.
₹299 च्या प्लानमध्ये 415 फ्री-टू-एअर आणि 45 पेड चॅनल्स म्हणजेच 450+ लाईव्ह टीव्ही चॅनल्स मोफत मिळतात.
Jio, Airtel आणि Vodafone-Idea यांच्या महागड्या डेटा प्लान्सच्या तुलनेत BSNL चे हे प्लान्स जास्त परवडणारे आहेत.
काही महिन्यांपूर्वीच BSNL ने देशभरात 4G सेवा सुरू केली करुन नेटवर्क सतत सुधारले जात आहे.
BSNL ने WiFi Calling सेवा सुरू केल्याने आता कमकुवत नेटवर्क असलेल्या भागातही कॉलिंग जास्त सोपी होणार आहे.