Sakshi Sunil Jadhav
जगप्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा, ज्यांना बाल्कनची नॉस्ट्रॅडेमस म्हटले जातं, त्यांच्या भविष्यवाण्यांमुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
प्रिन्सेस डायनाचा मृत्यू, कोविड-19 महामारीत झाला. हे त्यांचे भाकीत खरे ठरले. त्यामुळे त्यांच्या भाकीतांकडे दुर्लक्ष केलं जात नाही.
बाबा वेंगांच्या एका भविष्यवाणीनुसार, 2026 हे वर्ष मानवजातीसाठी ऐतिहासिक असू शकणार आहे. याच वर्षी माणसं आणि एलियन यांची पहिला भेट होणार आहे. अशा चर्चा सर्वत्र सुरु आहेत.
बाबा वेंगांच्या या भाकितानुसार, नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीच्या वातावरणात एक अंतराळयान प्रवेश करेल आणि त्यानंतर एलियनशी संपर्क होईल, असा दावा करण्यात आला आहे.
याच दरम्यान, प्रीप्रिंट सर्व्हर arXiv वर 16 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात पृथ्वीच्या दिशेने वेगाने येणाऱ्या एका अंतराळ वस्तूबाबत शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे.
‘3I/ATLAS’ नावाची ही वस्तू 1 जुलै रोजी शोधली गेली असून ती सुमारे 1 लाख 30 हजार मैलांच्या वेगाने सूर्याच्या दिशेने जात असल्याची माहिती समोर आली आहे.
सुरुवातीला ही वस्तू धूमकेतू असल्याचं मानलं जात होतं. पण काही संशोधकांच्या मते ती एलियनची गुप्तहेर तंत्रज्ञानानं तयार केलेली यंत्रणा असण्याची शक्यता आहे.
बाबा वेंगांच्या इतर भाकितांनुसार, 2026 मध्ये जगभरात भूकंप, ज्वालामुखी उद्रेक आणि तीव्र हवामान बदल यांसारख्या नैसर्गिक आपत्ती वाढू शकतात.
तसेच एआय मानवजातीवर वर्चस्व गाजवू शकतं, असा दावाही बाबा वेंगांच्या भविष्यवाणीत करण्यात आला आहे.
NEXT: Pear Benefits: रोज १ पेर खाल्याने या ४ समस्या होतील कायमच्या दूर