

कामाचा ताण हा प्रत्येक व्यक्तीला असतोच. रोज सकाळी उठून स्वत:ची कामं आवरण, महिला त्यांची आणि कुटुंबाची कामे आवरुन घराच्या बाहेर पडतात. यामुळे दिवसभर आपल्याला विशेष काही करायला वेळ मिळत नाही. अनेक जण व्यायाम, डाएट किंवा योगा करायचं दरवेळी ठरवतात पण त्यांचा तो निर्णय कधीच सक्सेस होत नाही. याने भविष्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. कारण तुमची लाइफस्टाइलच तुमचं आरोग्य ठरवते.
बदलत्या लाइफस्टाइलमुळे एक आजार जास्त वाढत चाललाय तो म्हणजे उच्च कोलेस्टेरॉल(High Cholesterol). याचं कारण फक्त तुमची लाइफस्टाइल नाही आणखी एक आहे. ते म्हणजे या आजाराची कोणतीच लक्षणे ठळक दिसत नाहीत. जेव्हा ही या आजाराची लक्षणे शेवटच्या टप्प्यात वाढतात तेव्हाच डॉक्टरांना याबद्दल कळतं. म्हणून याला 'सायलेंट किलर' म्हणतात. पुढे आपण याची लक्षणे आणि नेमक्या कोणत्या भागात वेदना होतात याबद्दल जाणून घेणार आहोत.
धमन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचल्याने रक्तप्रवाह कमी होतो आणि त्यामुळे वेदना, जळजळ किंवा अस्वस्थता जाणवते. हे या लक्षणांचे मुळ कारण असते. पण जेव्हा LDL म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल धमन्यांच्या भिंतींवर साचतं तेव्हा या आजाराची लक्षणे आपल्याला जाणवतात. कारण त्यामुळे तुमच्या धमन्या अरुंद आणि कडक होतात. याचा परिणाम तुमच्या ऑक्सिजनवर होतो. याचं कारण म्हणजे रक्तप्रवाह कमी झाल्या की ऑक्सिजन कमी पोहोचतं. यामुळे तुम्हाला वेदना, जळजळ आणि सुन्नपणा जाणवत असतो. ही सामान्य वाटणारी समस्या असली तरी यामुळे तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होतो.
कोलेस्टेरॉलची लक्षण तुमच्या शरीराच्या काही महत्वाच्या भागात होत असतात. पण ती आपण सहज दुर्लक्षित करतो. जसं की, चालताना पाय दुखणे, गोळे येणे, पाय सुन्न होणे किंवा झिणझिण्या येणे, पाय थंड पडणे या भागात तुम्हाला वेदना होतात. हे Peripheral Artery Disease (PAD) चे लक्षण सुद्धा असू शकतं.
चालताना किंवा तणावात छातीत कळ येणं हे एक गंभीर लक्षण आहे. तुमच्या ह्रदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे या वेदना होतात. तसेत या आजारात तुम्हाला पाठदुखी सुद्धा जाणवते. याचं कारण म्हणजे मणक्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या अरुंद होणे. काहींना कोलेस्टेरॉलची लक्षणे काखेत जाणवतात. अचानक काखेत दुखतं, जडपणा वाटतो. काहींना पोटात प्रचंड वेदना होतात. जेवणानंतर पोटात कळ येते. कारण आतड्यांना जाणारा रक्तपुरवठा कमी होतो.
तुम्ही जर वेळीच या आजारावर उपचार केलेत तर तुम्ही जीव वाचवू शकता. अन्यथा तुम्हाला हार्ट अटॅक, स्ट्रोक, रक्ताभिसरणाचे गंभीर आजार यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
१. संतुलित व कमी फॅट असलेला आहार घ्या.
२. रोज चाला, व्यायाम करा.
३. नियमित कोलेस्टेरॉल तपासा.
४. मधुमेह, रक्तदाब असल्यास विशेष काळजी घ्या.
टीप
ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.