Sakshi Sunil Jadhav
लहान मुलांचा सगळ्यात कंटाळवाणा विषय म्हणजे अभ्यास. जर तुमच्याही मुलांचा अभ्यास लक्षात राहत नसेल तर तुम्ही ही माहिती वाचाच.
पुढे आपण लहान मुलांसाठी त्यांची स्मरणशक्ती कमकुवत होऊ नये म्हणून उपाय जाणून घेणार आहोत.
तुमच्या मुलांच्या काही गोष्टी लक्षात राहत नसतील तर त्यांना ब्रेन बूस्टिंग मिल्क शेक देऊन तुम्ही हुशार करू शकता.
१ पिकलेलं केळं, भिजवलेलं अक्रोड, दूध, मध, खजूर, दालचिनी पावडर इ.
तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने हा मिल्क शेक तयार करू शकता. त्यासाठी सगळ्यात आधी अक्रोड भिजवून ठेवा.
भिजवलेलं अक्रोड एका मिक्सरच्या भांड्यात घाला. अक्रोड किमान ५ तास भिजवा.
आता मिक्सरमध्ये केळ, दूध, मध, खजूर घालून घ्या. हे अत्यंत पौष्टीक मिल्क शेक असणार आहे.
आता मिक्सर सुरु करून सगळे ड्रायफ्रुट्स एकत्र होईपर्यंत भिजवून घ्या. मग एका ग्लासात संपूर्ण मिश्रण गाळून घ्या.
तयार शेकमध्ये मुलांना आवडत असेल तर दालचिनी पावडर घालून मिक्स करा आणि मुलांना द्या.