Sakshi Sunil Jadhav
हिवाळ्यात अनेकांना कोरड्या त्वचेच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पुढे आपण यावर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
नारळ तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझर असून त्यातील फॅटी अॅसिड्स त्वचेला खोलवर पोषण देतात.
कोरड्या भागावर रात्री झोपण्याआधी नारळाच्या तेलाने मालिश केल्यास त्वचेत ओलावा टिकून राहतो.
ताजे एलोवेरा जेल त्वचेची जळजळ कमी करून खोलवर हायड्रेशन देते.
सूर्यप्रकाशामुळे किंवा अॅलर्जीमुळे खराब झालेल्या त्वचेसाठी एलोवेरा अत्यंत उपयुक्त ठरतो.
मध हे नैसर्गिक ह्युमेक्टंट असते. ते त्वचेतला ओलावा टिकवून ठेवते.
मलई त्वचेला खोलवर मॉइश्चर देऊन कोरडेपणा आणि पीलिंग कमी करते.
दररोज भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा आतून हायड्रेट राहते आणि कोरडेपणा कमी होतो.
केमिकलयुक्त साबण टाळून सौम्य क्लींजर आणि मॉइश्चरायझर वापरणं महत्त्वाचं आहे.