Sakshi Sunil Jadhav
सुंदर, नितळ आणि चमकदार त्वचा प्रत्येकालाच हवी असते. त्यासाठी अनेकजण महागड्या क्रीम्स, ब्यूटी प्रॉडक्ट्स आणि ट्रीटमेंट्स वापरतात. मात्र नैसर्गिक उपाय जास्त फायदेशीर असतात.
पपईचा फेसपॅक रोज वापरल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. हे बऱ्याच जणांना माहित नसतं.
पपईमध्ये असलेले पपेन एन्झाइम त्वचेवरच्या मृत पेशी हटवण्यास मदत करतात.
काळे डाग, टॅनिंग आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी पपई खूप फायदेशीर ठरते.
तेलकट त्वचेसाठी पपई फायदेशीर असते. त्याने चेहऱ्यावरचं तेल कमी होतं.
पपई त्वचा स्वच्छ ठेवते, त्यामुळे पिंपल्सची समस्या कमी होण्यास मदत होते.
पपईतील पोषक घटक त्वचेला पोषण देऊन ती सॉफ्ट बनवतात. तर केमिकल स्क्रबऐवजी पपईचा वापर सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय मानला जातो.
रोजच्या वापरामुळे त्वचेचा टोन सुधारतो आणि फ्रेश लूक मिळतो. पिकलेली पपई मॅश करून थेट चेहऱ्यावर लावता येते, त्यामुळे खर्चही कमी होतो.