Sakshi Sunil Jadhav
दिवसभराच्या थकवा घेऊन अनेक महिला मेकअप न काढताच झोपतात. मात्र ही सवय त्वचेसाठी खूप घातक ठरू शकते.
चेहऱ्यावरचा मेकअप, धूळ आणि प्रदूषणमुळे पोर्स बंद होतात. त्यामुळे पिंपल्स, ब्लॅकहेड्स, त्वचा निस्तेज होणे आणि वयाच्या आधीच वृद्ध दिसण्याच्या समस्या जाणवतात.
मेकअप काढण्याआधी हात साबणाने नीट धुवा. घाणेरड्या हातांमुळे बॅक्टेरिया त्वचेवर जाऊन इन्फेक्शन होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, फक्त फेसवॉश किंवा मेकअप वाइप्सने मेकअप पूर्ण निघत नाही उलट तो त्वचेवर पसरतो.
सेंसिटिव्ह व पिंपल्स येणाऱ्या त्वचेसाठी Micellar Water वापरा. Oil Cleanser हे वॉटरप्रूफ मेकअप व सनस्क्रीनसाठी काढण्यासाठी वापरा.
किमान एक मिनिट हलक्या हातांनी मसाज केल्याने मेकअप नीट निघतो आणि त्वचा स्वच्छ होते.
डोळ्यांची त्वचा नाजूक असते. काजळ, आयलाइनर, मस्कारा काढण्यासाठी चांगल आय मेकअप रिमूवर वापरा. जोरात घासू नका.
मेकअप काढल्यानंतर सॉफ्ट फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे उरलेले रेसिड्यू काढले जातात.
योग्य पद्धतीने मेकअप काढणं म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि चमकदार त्वचेची पहिली स्टेप आहे. लक्षात ठेवा, सुंदर त्वचेची सुरुवात नेहमी स्वच्छ त्वचेपासूनच होते.